वसुली आली की सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’, ठाकरे सरकारच्या मदतीवर फडणवीसांचं बोट

मदतीचे आकडे तर त्याहून संतापजनक असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय. मार्च ते मे 2021 मध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्हा 5.10 लाख, सिंधुदुर्ग जिल्हा 24 लाख, परभणी जिल्हा 25 लाख, हिंगोली 14 लाख, नांदेड 20 लाख, उस्मानाबाद 1.74 लाख, यवतमाळ 10 लाख, नागपूर 23 लाख, वर्धा 39 लाख, गोंदिया 26 लाख, चंद्रपूर 35 लाख रुपये फक्त मदतीची घोषणा केली.

वसुली आली की सरकारचा 'ससा' होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटलं की 'कासव', ठाकरे सरकारच्या मदतीवर फडणवीसांचं बोट
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 8:30 PM

मुंबईः ठाकरे सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित शेतक-यांना मोठा दिलासा देत मदतीची घोषणा केली होती, आता त्याच मदतीवरून भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. वसुली आली की सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

 मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा

या सरकारमध्ये चाललेय तरी काय? विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा आहे. मदतीचे आकडे तर त्याहून संतापजनक असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय. मार्च ते मे 2021 मध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्हा 5.10 लाख, सिंधुदुर्ग जिल्हा 24 लाख, परभणी जिल्हा 25 लाख, हिंगोली 14 लाख, नांदेड 20 लाख, उस्मानाबाद 1.74 लाख, यवतमाळ 10 लाख, नागपूर 23 लाख, वर्धा 39 लाख, गोंदिया 26 लाख, चंद्रपूर 35 लाख रुपये फक्त मदतीची घोषणा केली.

शेतकर्‍यांप्रति ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय?

तसेच नागपूर विभागातील 6 जिल्हे मिळून फक्त 10 कोटी रुपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील सर्व 5 जिल्हे मिळून फक्त 1 लाख रुपये! म्हणजे एक जिल्हा फक्त 20 हजार रुपये, अशी जुलै 2021च्या मदतीची घोषणा करण्यात आली होती. शेतकर्‍यांप्रति ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय?, असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय.

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 122 कोटी 26 लाखाचा निधी मंजूर

दुसरीकडे पावसाच्या लहरीपणाचा सामना राज्यातील शेतकऱ्यांना करावा लागलाय. केवळ खरीपातीलच नाही तर मार्च, एप्रिल व मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे (Heavy Rain) आणि गारपिटीमुळे (Loss of farmers due to hailstorm) शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले होते. गत महिन्यात झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे सुरूच आहेत. पण मार्च, एप्रिल व मेदरम्यान झालेल्या नुकसानभरपाईसाठी 122 कोटी 26 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून, तो वितरीत करण्याच्या सुचना विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

गारपीट व अवेळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे 2021 या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निधीचे वितरण करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. याकरिता 122 कोटी 26 लाख 30 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

मत्स्यव्यवसायात क्रांती : ‘ई-फिश मार्केट अ‍ॅप’ मुळे मासे उत्पादकांना थेट फायदा

काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना? योजनेतील बदल शेतकऱ्यांच्या हिताचा

devendra fadnavis criticism on thackeray government on farmers help

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.