उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे एका वाक्यात उत्तर

शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घेत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे- देवेंद्र फडणवीस भेटीवरून लगावला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे एका वाक्यात उत्तर
uddhav thackeray devendra fadnavis
| Updated on: Jun 20, 2025 | 10:31 AM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, जे शिवसैनिकांच्या मनात आहे, जे राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार आहेत. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घेत आहेत, असा टोला उद्धव यांनी राज ठाकरे- देवेंद्र फडणवीस भेटीवरून लगावला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. जळगावात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांचे स्मारक व संग्रहालयाचे त्यांच्या हस्ते धरणगाव येथे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व आदिवासी स्वातंत्र्य सेनानींचा गौरव झाला पाहिजे, यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहे. मी क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आलो होतो. आता उद्घाटनाची संधीही मला मिळाली.

खडसे यांच्यावर म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, बोलबच्चन भैरवी यांना मी उत्तर देत नाही. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बोलबच्चन भैरवी म्हणत हे उत्तर दिले आहे. कार्यक्रमास आमदार एकनाथ खडसे येणार का? या प्रश्नावर खडसे येणार का? याबाबत मला माहिती नाही.

जळगाव देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी दौरा आहे. त्यांचे विविध कार्यक्रम आहे. यामुळे एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होते का? याकडे लक्ष लागले आहे. खडसे यांनी भाजप पक्षप्रवेशाचा आपला विषय केव्हाचा संपला आहे, असे वक्तव्य करत या विषयाला पूर्णविराम दिला आहे.