पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी फडणवीस म्हणतात, बंजारा समाज अस्वस्थ, पोलीस महासंचालकांनाही पत्र 

परळीच्या पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहिलं आहे. (Devendra Fadnavis Pooja Chavan suicide issue)

पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी फडणवीस म्हणतात, बंजारा समाज अस्वस्थ, पोलीस महासंचालकांनाही पत्र 
पुजा चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस

मुंबई : परळीच्या पूजा चव्हाण ( Pooja Chavan suicide) आत्महत्येप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना (Maharashtra Director General of Police) एक पत्र लिहिलं आहे. या प्रकरणात ज्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. त्याच पत्रात त्यांनी बंजारा समाज अस्वस्थ असल्याचं म्हटलं आहे. (Devendra Fadnavis written letter to Maharashtra Director General of Police on Pooja Chavan suicide issue)

फडणवीसांच्या पत्रात नेमकं काय?

पोलीस महासंचालकांना चौकशीची मागणी करणारं जे पत्र फडणवीसांनी लिहिलं आहे त्यात ते म्हणतात, पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी समाजमाध्यमांवर विविध चर्चा होत आहेत. त्यामुळे बंजारा समाजात अस्वस्थता असून याप्रकरणी चौकशीची नितांत गरज आहे. फडणवीस पत्रात पुढे असही म्हणतात की, या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे कोण आहेत, त्याचा अर्थ काय? पूजा चव्हाणनं आत्महत्या केली की तिला प्रवृत्त केलं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

फडणवीसांच्या पत्रात बंजारा समाजाचा उल्लेख

पत्राच्या शेवटच्या भागात फडणवीस म्हणतात, पूजा चव्हाण ही बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय होती. तिच्या आत्महत्येमागील घटनाक्रम हा संशयास्पद असल्याचा आरोप बंजारा समाजातून होत आहे. त्यामुळे ह्या सर्व ऑडिओ क्लिपची सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे  आहे. ही चौकशी तात्काळ करुन बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या तरुणीला न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.

जे फडणवीसांच्या पत्रात नाही ते चित्रा वाघांनी बोलून दाखवलं

फडणवीसांच्या पत्रात ऑडिओ क्लिपमध्ये बोलत असलेला कथित मंत्री कोण याच्या नावाचा थेट उल्लेख नव्हता. भाजपच्या नेत्यांनी ते घेण्याचं टाळलं. पण काल रात्री भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्या क्लिपमधला आवाज हा शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा थेट आरोप करुन मुसक्या आवळण्याची मागणी केली. त्यानंतर राठोड अडचणीत आले.

कोण आहेत संजय राठोड?

फडणवीसांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी बंजारा समाजात अस्वस्थता असल्याचं म्हटलं आहे. पुजा ही परळीची असली तरीही संजय राठोड ज्या भागातून निवडुण येतात त्या यवतमाळमध्येही बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. सलग चार वेळेस संजय राठोड निवडुण येत आहेत. लोकांच्या संपर्कात असलेला नेता म्हणून मंत्री संजय राठोड यांची ओळख आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राठोडांबाबत काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या:

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(Devendra Fadnavis written letter to Maharashtra Director General of Police on Pooja Chavan suicide issue)

Published On - 8:12 am, Sat, 13 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI