AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढणार; निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रार काय ?

रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळ देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढणार; निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रार काय ?
Image Credit source: Google
| Updated on: Mar 02, 2023 | 7:47 AM
Share

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी प्रचार करत असतांना आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी केला आहे. रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे  केलेल्या तक्रारीत प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान कसबा पेठ मतदार संघ हिंदुत्ववादी आहे. त्याच वेळी पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख करत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने पुण्येश्वर मंदिराच्या बाबत भूमिका स्पष्ट करावी असं म्हंटलं होतं. याच विधानाचा आधार घेत रवींद्र धंगेकर यांनी तक्रार केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन रवींद्र धंगेकर आरोप केला आहे. निवडणूक प्रचाराच्या वेळी धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केल्याचा मुद्दा मांडला आहे.

उपूमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा करत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी तक्रार दाखल करत निवडणूक आयोगाकडे रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहे. कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून हेमंत रासने यांना मैदानात उतरविण्यात आले होते. अत्यंत चुरशीची अशी निवडणूक पाहायला मिळाली होती.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून प्रचार करत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, यांच्यासह राज्यातील मंत्री तळ ठोकून होते. तर कॉंग्रेसकडून नाना पटोले यांच्यासह कॉंग्रेसच्या प्रदेश स्तरावरील नेत्यांनी कसबा मतदार संघात मुक्काम ठोकला होता.

अतिशय प्रतिष्ठेची झालेली ही निवडणूक अखेरच्या टप्प्यात पैसे वाटपाच्या आरोपावरुन राज्यभर चर्चेत आली आहे. रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांच्या कडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत उपोषण सुरू केले होते. त्यावरुन मोठं रणकंदन पुण्यात माजले होते.

दरम्यान यावर भाजप कडून रवींद्र धंगेकर असे स्टंट करत असतात असा दावा करत त्यांच्यावर सडकून टीका केली होती. याच दरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.