देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीसांचं मोठं विधान

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. यावर बोलताना आता अमृता फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या.

देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीसांचं मोठं विधान
अमृता फडणवीस यांचं मोंठ विधान
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 24, 2026 | 9:09 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. यावर बोलताना अनेकदा देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेचं खंडण केलं आहे.  दरम्यान यावर आता अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या. यावर बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. मला महाराष्ट्रातच राहायचं आहे,  मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सध्या देशभरात वेगवेगळी आंदोलन सुरू आहेत, त्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमंक काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता अमृता फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. मला महाराष्ट्रातच राहायचं आहे,  मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या देशभरात आंदोलनं सुरू आहे, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाच्या बाबतीत सरकार काम करत आहे. फास्टट्रॅक कोर्ट असेल किंवा इतर काही बदल असेल असे वेगवेगळे बदल सरकार करत आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेत आहे, असं यावेळी अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर सीजेपीकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता येत्या 26 जुलै रोजी मुंबईत ठाकरे बंधूंकडून भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे, यावर देखील अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एकत्र येऊन काहीतरी करतायेत, हीच चांगली गोष्ट आहे. आपल्य़ाला पॉझीटीव्ह घेतलं पाहिजे, असं यावेळी अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.  आपला बळी राजा सुखी होवो, सगळ्यांचे प्रश्न सुटो
आपल्या लोकप्रतिनिधी यांना लोकसवेची सदबुद्धी मिळो, असंही यावेळी अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us