AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MahaShivratri : बम बम भोले.. जयघोष करत भाविक मंदिरात दाखल, राज्यभरातील मंदिरं गर्दीने फुलली

महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. त्र्यंबकेश्वर, बनेश्वर आणि कपिलेश्वर यासारख्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये लाखो भाविक दर्शन घेणार आहेत. मंदिरे सजवण्यात आली असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाविकांच्या सुकर दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

MahaShivratri :  बम बम भोले.. जयघोष करत भाविक मंदिरात दाखल, राज्यभरातील मंदिरं गर्दीने फुलली
महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी
| Updated on: Feb 26, 2025 | 7:44 AM
Share

आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. बम बम भोले चा जयघोष करत हजारो , हजारो भाविक हे राज्यातील विविध मंदिरात दाखल झाले आहेत. महाशिवरात्र हा वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस समजला जातो, आणि त्याचनिमित्ताने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्व महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. संपूर्ण मंदिर सुंदर फुलांनी सजले; आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भक्तिमय वातावरण आहे. दर्शनाचे पुण्य घेण्यासाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासूनच मंदिराच्या बाहेर भाविकांची मोठी रांग लागलेली पहायला मिळाली. पहाटे मंदिरात महादेवाची षोडषोपचारे पूजा संपन्न झाली. तर आता दिवसभर मंदिरात विविध धारमिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यासोबतच तीन दिवस संपूर्ण मंदिराच्या प्रांगणामध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे या चैतन्यमय वातावरणात सहभागी होण्यासाठी, पुण्याचा संचय करण्यासाठी हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येताना दिसत आहेत.

श्री क्षेत्र बनेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

दरम्यान पुण्याच्या भोरमधील नसरापूर येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र बनेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. बम बम भोले या अखंड गजरात, स्मरण करत बनेश्वर शिवमंदिर परिसर, महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने फुलला आहे. रात्री बारा वाजता मंदिरात भोरचे प्रांत अधिकारी विकास खरात आणि तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या हस्ते शासकीय पूजा आणि आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी करण्यात दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. रात्री 12 वाजल्यापासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. दरवर्षी लाखो भाविक महाशिवरात्रीनिमित्त बनेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यातं आलीय. दर्शनबारीसाठी मंडप, विज वितरण कंपनीच्या वतीने या भागातील विज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असुन आरोग्य विभागाच्या वतीने यात्रेत मंदिर परिसरात आरोग्यपथक तैनात ठेवण्यातआल्या आहेत, वनविभागाच्या वतीने मंदिर परिसरात स्वछता राखण्यात येत आहे..

सुप्रिया सुळेंनी घेतलं दर्शन

महाशिवरात्रीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या भोर तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र बनेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. त्यांनी महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेत विधिवत पूजा केली. पहाटे 05:30 च्या सुमारास मंदिरात येत सुळे यांनी महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. या दरम्यान सुळे यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी सवांदही साधला. भोर तालुक्यातील नसरापूर येथील बनेश्वर मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असूवन नेहमी लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात.

कपिलेश्वर महादेव मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी.

महाशिवरात्रीनिमित्त दापचरी येथील कपिलेश्वर महादेव मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी. दुग्ध प्रकल्प मधील प्रसिद्ध कपिलेश्वर महादेव मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच संपूर्ण मंदिर सुंदर फुलांनी सजले; डहाणू तलासरी परिसरातील अनेक भाविक भक्तीभावाने महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येत असून यात्रेत सहभागी होतात. मंदिरात पहाटे 4 वाजेपासून महादेवाचा महाअभिषेक संपन्न झाला असून दिवस भर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.