मग माझ्यासहीत अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला… धनंजय मुंडे संतापले; जरांगेंच्या आरोपांची पिसेच काढली

Dhananjay Munde: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

मग माझ्यासहीत अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला... धनंजय मुंडे संतापले; जरांगेंच्या आरोपांची पिसेच काढली
Dhananjay-Munde
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 07, 2025 | 2:41 PM

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यानंतर या आरोपावर प्रतिक्रिया देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची दादागिरी सुरु आहे असे म्हटले आहे. तसेच आरक्षाच्याविषयावर बोलताना त्यांनी, मग माझ्यासहीत अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला.. असे म्हटले आहे.

दादागिरी सुरू आहे. अंतरवलीतूनच अंतर पडत चाललं आहे. तुमच्या मेहुण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले. मी सरकारला विचारणार आहे. त्यात काय कारवाई झाली. सामान्य माणसाला एमपीडीएमध्ये घालतात. यांची यादी देऊन काय कारवाई झाली असा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

धनंजय मुंडेंनी विचारले दोन प्रश्न

जरांगेजी असं करू नका. दोन समाजात फूट पाडू नका. मी दोन प्रश्न विचारले त्याची माहिती द्या. धन्याचं बी ठेवायचं नाही. ही धमकी नाही. धनंजय मुंडेंचं बी सुद्धा ठेवायचं नाही. ही धमकी कुणी दिली. वंजारी जातीचं बी सुद्धा ठेवायचं नाही. ओबीसींचं सर्व बीला बी ठेवायचं नाही ही धमकी कुणी दिली. सरकार त्यांचंच ऐकत असेल तर अख्ख्या ओबीसींनी गोळ्या घाला आणि संपवून टाका आम्हाला. सर्व यंत्रणा तुमच्या म्हणण्याने चालत असतील तर संपवा आम्हाला. फक्त तुम्हीच राहा असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल. पण इथली पोलीस यंत्रणा कोणत्याही जाती धर्माचे असो यांना घाबरून आहे. म्हणूनच कर्ते करवते तेच आहेत. सर्वांचाच टार्गेट धनंजय मुंडे का. एवढ्या जणांना मी आवरला जात नाही का. कमाल आहे. त्या दिवशीच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला त्याचा राग आला की मी चष्मा पाठवला नाही याचा राग आला. माझ्यापासून संमद्या पृथ्वीतलाला धोका आहे असं समजा. मी काय कोव्हिड व्हायरल झालो काय आता. एका मंत्र्याला माझ्यासापासून धोका..