AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत, ते प्रकरण भोवणार? गुन्हा दाखल करण्याची मागणी

धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत, आता पुन्हा एकदा ते एका प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

मोठी बातमी! धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत, ते प्रकरण भोवणार? गुन्हा दाखल करण्याची मागणी
dhananjay munde Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 10, 2026 | 4:17 PM
Share

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. पुन्हा एकदा धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा भवनसाठी दिलेल्या जागेवरून वाद पेटला आहे. धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली असा आरोप त्यांच्यावर होत आहे. दरम्यान या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली, त्यांनी मराठा भवनसाठी श्री दत्त देवस्थान थोरले देवघर यांच्या जमिनिचा बेकायदेशीरपणे ताबा दिला, असा आरोप  श्री दत्त देवस्थान थोरले देवघरचे अध्यक्ष योगेश गोस्वामी यांनी केला आहे. दरम्यान आता हा वाद चांगलाच पेटला असून, या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

परळीमध्ये 14 मे रोजी आमदार धनंजय मुंडे यांनी भूमिपूजन करत मराठाभवन साठी 28 गुंठे जमीन दिली होती. मात्र या जमिनीवरून आता मोठा वाद पेटला आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचे सर्व कागदपत्रे आणि निवेदन देऊन सदरील जमीन आपल्या मालकीची असून तिचा बेकायदेशीर ताबा देण्यात आला, या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आता संस्थाच्या वतीनं करण्यात आली आहे.

श्री दत्त देवस्थान संस्थानच्या मालकीच्या 28 गुंठे इनामी जमिनीचा बेकायदेशीर ताबा ‘मराठा भवन’साठी दिल्याप्रकरणी परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पोपट निगळ, नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यासह अन्य संबंधितांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी संस्थानने बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. वर्ग-2 ची ही इनामी जमीन आहे, असं असतानाही  संगनमताने बनावट कागदपत्रांद्वारे जमीन बळकावून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. दरम्यान कारवाई न झाल्यास हायकोर्ट जाण्याचा आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा देखील यावेळी संस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर