AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी मुलांना स्वीकारतो, पण त्यांच्या आईशी लग्न केलेले नाही, धनंजय मुंडेंच्या वकिलाचा युक्तीवाद

धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देत कोर्टात युक्तिवाद केला. त्यांनी मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केले नाही, असा दावा केला. मुलांना आर्थिक मदत देण्याची तयारी असल्याचे सांगत, करुणा मुंडे स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचेही नमूद करण्यात आले.

मी मुलांना स्वीकारतो, पण त्यांच्या आईशी लग्न केलेले नाही, धनंजय मुंडेंच्या वकिलाचा युक्तीवाद
Karuna Sharma dhananjay munde (1)
| Updated on: Mar 29, 2025 | 1:34 PM
Share

राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला २ लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी होत आहे. करुणा मुंडे यांना पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. तर पोटगीची रक्कम तुटपुंजी असून ती 9 लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे. आता याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली.

करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही

करुणा मुंडे यांना पोटगी मिळण्याप्रकरणी अंतिम युक्तीवाद सुरु आहे. आता धनंजय मुंडे यांच्या बाजूने वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. धनंजय मुंडेंनी मी मुलांना स्वीकारत आहे, पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही, असा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला. यावेळी धनंजय मुंडेंच्या वकिलांनी धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही, असा दावाही केला.

त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम

राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत. मी मुलांना स्वीकारत आहे, पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही. धनंजय मुंडे यांचे करुणा मुंडेंसोबत झालेले लग्न अधिकृत नाही. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही. करुणा मुंडे यांना १५ लाखाच्या जवळपास वर्षाला इन्कम आहे, त्या इन्कम टॅक्स भरतात. त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे, असा युक्तीवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला.

करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. त्यांना माझ्या पैशांची गरज नाही. त्या स्वतः स्वतःचा खर्च मॅनेज करत आहेत. सातत्याने करुणा माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहे. करुणा मुंडे या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, असेही धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

Follow Us
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....