AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आमचा आधारस्तंभ चोरला…’, जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर धनंजय मुंडे यांची टीका

"ही पाकिटमारांची टोळी आहे, पाकिटमारांची. अरे तुमच्यात हिंमत होती ना, मर्दाची अवलाद असता अजित पवार तर बोलला असता, शरद पवारने तुतारी घेतली, मी सुद्धा दुसरी कोणती निशाणी शोधून घेतो आणि निवडणूक लढवतो, तसं बोलले असते तर आम्ही त्यांना मर्द म्हणाला असतो", असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाडांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

'आमचा आधारस्तंभ चोरला...', जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर धनंजय मुंडे यांची टीका
जितेंद्र आव्हाड, अजित पवारImage Credit source: Facebook
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 03, 2024 | 5:41 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना आज जीभ घसरली. ते मुंब्र्यात बोलत होते. यावेळी अजित पवार यांच्याबाबत बोलत असताना आव्हाडांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. अजित पवार गट ही पाकिटमारांची टोळी असल्याची टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. आव्हाडांच्या या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आव्हाडांच्या वक्तव्यावरुन मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही एकत्र असताना ज्यांना आधारस्तंभ मानत होतो, आता आम्ही त्यांना म्हणायचं का त्यांनी आमचा आधारस्तंभ चोरला?”, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे आव्हाडांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या नेतेमंडळींकडून टीका झाल्यानंतर देखील आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा होता? जोरात सांगा. शरद पवारांना एक दिवस अजित पवार येतो आणि धक्का मारुन पक्षातून बाहेर काढून टाकतो. विशेष म्हणजे जाताता शरद पवारांच्या हातून घड्याळ देखील हिसकावून घेतो. ही पाकिटमारांची टोळी आहे, पाकिटमारांची. अरे तुमच्यात हिंमत होती ना, मर्दाची अवलाद असता अजित पवार तर बोलला असता, शरद पवारने तुतारी घेतली, मी सुद्धा दुसरी कोणती निशाणी शोधून घेतो आणि निवडणूक लढवतो, तसं बोलले असते तर आम्ही त्यांना मर्द म्हणाला असतो”, असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

“जितेंद्र आव्हाड यांचे आजपर्यंतचे जे वक्तव्य ऐकले असते, आम्ही एकत्र असताना ज्यांना आधारस्तंभ मानत होतो, आता आम्ही त्यांना म्हणायचं का त्यांनी आमचा आधारस्तंभ चोरला? एक लक्षात घ्या, कुणाची काय परिस्थिती, कोण कुणासोबत या सगळ्या गोष्टी आज बोलणं उचित नाही. कुणाला पाकिटल चोरणं म्हणतात त्यांनी आज जे काही झालंय घडलंय, ते येणारा काळ सांगेल”, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर दिली.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स