AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पहाटेची शपथ घेऊ नका, मी अजित दादांना सांगितलं होतं पण…”, धनंजय मुंडेंकडून मोठा गौप्यस्फोट

धनंजय मुंडे यांनी २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी अजित पवारांना शपथ घेऊ नये, असे सांगितले होते, पण ते ऐकले गेले नाही. यामुळे त्यांना शिक्षा भोगावी लागली, असे त्यांनी म्हटले आहे.

पहाटेची शपथ घेऊ नका, मी अजित दादांना सांगितलं होतं पण..., धनंजय मुंडेंकडून मोठा गौप्यस्फोट
dhananjay munde morning oath ceremoney
| Updated on: Jan 19, 2025 | 2:27 PM
Share

Maharashtra oath ceremony 2019 : महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी हा सर्वात मोठ्या नाट्यमय घडामोडींपैकी एक म्हणून ओळखला जातो. 2019 मध्ये भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवल्या. मात्र मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या मुद्यावरून दोन पक्षांमध्ये वाद झाला. यानंतर शिवसेना भाजपची युती तुटली. यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. मात्र यादरम्यान 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेत सरकार स्थापन केलं होतं. अजित पवारांनी पहाटे गुपचूप शपथ घेतली आणि यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. हे सरकार फक्त 80 तास चालले. त्या शपथविधीवरून अनेकदा विविध गौप्यस्फोट होत असतात. आताही अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

धनंजय मुंडे यांनी नुकतंच जाहीरपणे भाषण केले. यावेळी त्यांनी बीडमध्ये सुरु असलेल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणासह पहाटेच्या शपथविधीपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना सांगत होतो की तुम्ही जाऊ नका, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला.

..याची शिक्षा मात्र मला मिळाली

“2019 साली पहाटेची शपथ घेऊ नका, असे मी अजित पवार यांना सांगितले होते. सुनील तटकरे याचे साक्षीदार आहेत. मात्र अजितदादांनी ते ऐकलं नाही. त्यांनी ती शपथ घेतली. पण याची शिक्षा मात्र मला मिळाली”, अशी खंत धनंजय मुंडेंनी व्यक्त केली.

महायुतीतील नेत्यांकडून मला टार्गेट केलं जातंय

“मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा इत्यादींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. पण आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणी मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडून मला टार्गेट केलं जातंय. याचेच जास्त वाईट वाटत आहे”, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...