AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी जात-पात धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून… धनंजय मुंडे असं का म्हणाले?

Dhananjay Munde : परळीत मराठा भवनाच्या उभारणीसाठी धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.

मी जात-पात धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून... धनंजय मुंडे असं का म्हणाले?
Dhananjay Munde SpeechImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 16, 2026 | 2:35 PM
Share

माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी केलेलं एक भाषण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मराठा भवन उभारणीसाठी परळीत 28 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे मराठा युवा मंचकडून आमदार धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. मी जात-पात धर्म सोडून राजकारण केलं, मात्र मला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला असं मुंडे यांनी म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

धनंजय मुंडे यांचे भाषण

धनंजय मुंडे यांनी म्हटले की, ‘छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जे वातावरण होतं ते महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिलं. मधल्या काळात काही गोष्टी झाल्या त्याची चर्चा आता होऊ नये. मराठ्यांच्या भावनांचा विषय माझ्या दृष्टीने आत्मीयतेचा विषय होता. तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, मधल्या काही दोन-तीन वर्षाचा विषय सोडला तर तुम्ही जेवढा जीव लावला त्याचे माझ्यावर उपकार आहेत. मधल्या दोन-तीन वर्षात काय झालं त्यामुळे माझ्या कर्तव्यात काही बदल होऊ शकला नाही.

मला लाथा मारून…

पुढे बोलताना मुंडे यांनी म्हटले की, मी जात-पात धर्म सोडून राजकारण केलं आहे. पण मला लाथा मारून हाकलण्याचा प्रयत्न झाला. जे काही आहे ते आहे, ताकाला जाऊन भांड लपवायचा स्वभाव माझा नाही. डोक्यात आहे ते ओठावर आहे जे ओठावर आहे ते डोक्यात आहे. आपण मराठा समाजाला दिलेली जागा संपूर्ण डेव्हलप करून देणार आहोत. परळीत होत असलेला एग्रीकल्चर कॉलेजचे काम पुढच्या पन्नास वर्षाचा अंदाज घेऊन केले जात आहे, तशाच पद्धतीचे हे मराठा भवन असणार आहे.

माझा नियतीवर विश्वास आहे…

धनंजय मुंडे यांनी पुढे बोलताना म्हटले की, याआधी अनेकदा बैठका गार्डनमध्ये घ्यावा लागत होत्या, ते मला बघवत नव्हतं. झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी या तात्पुरत्या असतात आंदोलन तात्पुरते असतात, एखाद्या बद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते. आज ना उद्या खरं काय ते कळतच. त्यामुळे मी दीड वर्ष शांत होतो. माझा नियतीवर फार विश्वास आहे. माझी नियत साफ राहिली तर माझ्या बाबतीत जो गैरसमज झाला आहे तो नियतीच दुरूस्त करून देणार आहे. हे मला माहित आहे म्हणून आज हे सगळं नियतीने घडवला आहे.

पुढे धनंजय मुंडे यांनी म्हटले की, ‘तालुकास्तरावरील 28 गुंठ्यावर हे पहिलंच मराठा भवन असणार आहे. या वास्तूची एक एक वीट रचण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. ही जबाबदारी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं व्यक्त करतो. लोकप्रतिनिधीच्या निवडणुकीत कोणी विरोध केला असेल. शेवटी निवडून आल्यावर तो लोकप्रतिनिधी त्या मतदार संघातील सर्व जनतेचा असतो. समाजामधील अल्पभूधारक असलेल्या नागरिकांसाठी हे मराठा भवन म्हणजे शैक्षणिक मंदिर होणार आहे याचा मला आनंद आहे.’

Follow Us
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात