AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी भाजपासाठी तयारी, आता शिंदे गटाच्या वाटेवर, धाराशिवच्या त्या 5 नगरसेवकांची राज्यात चर्चा

Dharashiv Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले होते, मात्र आता हे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

आधी भाजपासाठी तयारी, आता शिंदे गटाच्या वाटेवर, धाराशिवच्या त्या 5 नगरसेवकांची राज्यात चर्चा
Eknath Shinde Uddhav ThackerayImage Credit source: Google
| Updated on: Aug 26, 2026 | 9:39 PM
Share

धाराशिवच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले होते, मात्र हे नगरसेवक पुण्यातूनच माघारी फिरले होते. आता हेच पाच नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या पाचही नगरसेवकांचा मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी निघालेल्या नगरसेवकांनी पुण्यातूनच माघार घेतल्यानंतर धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र आता हे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

पुण्यातच घडला राजकीय ट्विस्ट

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या या नगरसेवकांची पुण्यातच शिवसेनेच्या नेत्यांनी भेट घेऊन समजूत काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र आता त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या संभाव्य पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात भाजप आणि शिंदेसेनेमधील अंतर्गत राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कळंबनंतर धाराशिव शहराकडे लक्ष

काही दिवसांपूर्वी कळंबमध्ये ठाकरे गटातील नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर धाराशिव शहरातील या पाच नगरसेवकांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच पुण्यातून त्यांना माघारी फिरावे लागले. आता हे पाच नगरसेवक भाजपऐवजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आल्याने धाराशिवच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

या पाच नगरसेवकांच्या संभाव्य पक्षप्रवेशानंतर धाराशिव शहरातील राजकीय समीकरणे नेमकी कशी बदलतात, तसेच भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक संबंधांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Follow Us
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...