धुळ्यात सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची बाईकला धडक, घटनेनंतर महिला अधिकाऱ्याने काढला पळ

| Updated on: Apr 09, 2022 | 3:26 PM

अपघातानंतर जखमीला वैद्यकीय मदत मिळवून देण्याची तसदीही करनवास यांनी घेतली नाही. त्यांनी साक्री पोलिस स्टेशन आणि निजामपूर पोलिस ठाण्यात कॉल करुन पर्यायी गाडी मागवली आणि तेथून पळ काढून निघून गेल्या. एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने अशा प्रकारे घटनास्थळावरून पळ काढणे ही अत्यंत खेदाची बाब आहे.

धुळ्यात सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची बाईकला धडक, घटनेनंतर महिला अधिकाऱ्याने काढला पळ
धु्ळ्यात सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची बाईकला धडक
Image Credit source: TV
Follow us on

धुळे : सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची गाडी आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघाता (Accident)त मोटारसायकलस्वाराचा मृत्यू (Death) झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात कळंबिर गावाजवळ घडली. धक्कादायक बाब म्हणजे अपघातावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करनवाल या स्वतः गाडीत उपस्थित होत्या. मात्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटारसायकलस्वाराला मदत करण्याऐवजी दुसऱ्या गाडीची व्यवस्था करुन घटनास्थळावरुन पळ काढला. जगन पिराजी मारनर असे अपघातात ठार झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. (Assistant Collectors car hits bike in Dhule woman officer escapes after incident)

भीषण अपघातात मोटारसायकलस्वार ठार

साक्री तालुक्यातील कळंबिर गावाजवळ शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाईक आणि इनोव्हा कारमध्ये भीषण अपघात झाला. सदर इनोव्हा कार ही सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नंदुरबार मिनल करनवाल यांची होती. या अपघात करनवाल यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र मोटारसायकलवरील जगन मारनार यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमीला वैद्यकीय मदत मिळवून देण्याची तसदीही करनवास यांनी घेतली नाही. त्यांनी साक्री पोलिस स्टेशन आणि निजामपूर पोलिस ठाण्यात कॉल करुन पर्यायी गाडी मागवली आणि तेथून पळ काढून निघून गेल्या. एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने अशा प्रकारे घटनास्थळावरून पळ काढणे ही अत्यंत खेदाची बाब आहे.

संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको

ही घटना झाल्यानंतर देखील आरोपीला पोलीस प्रशासनाने अद्याप अटक केली नसल्याने आज मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी साक्री पोलीस स्टेशनसमोर महामार्ग क्रमांक 6 वर मृत व्यक्तीचे शव ठेवून रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांचा रोष बघता साक्री पोलीस निरीक्षक अजयकुमार चव्हाण यांनी मध्यस्थी केली व आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांकडून रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आहे. (Assistant Collectors car hits bike in Dhule woman officer escapes after incident)

इतर बातम्या

CCTV | सीसीटीव्ही लावल्यावरुन वाद, सोसायटी सदस्यांनी बापलेकाला केलेली मारहाणही सीसीटीव्हीत कैद

Chandrapur Crime | भद्रावतीत सापडला होता मुंडकं नसलेला नग्नावस्थेतील युवतीचा मृतदेह, युवती रामटेकची असल्याची ओळख पटली