AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime | नवऱ्याने गे असल्याचं लपवलं, हनिमूनवर बायकोला समजलं, ठाण्यातील 32 वर्षीय तरुण अडचणीत

स्वतःचे सेक्शुअल ओरिएंटेशन लपवून ठेवत नवविवाहित पत्नीला फसवल्या प्रकरणी ठाणे कोर्टाने आरोपी पतीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपी पतीने लग्नानंतरही समलिंगी संबंध कायम ठेवत ते पत्नीपासून लपवून ठेवल्याचा आरोप आहे.

Thane Crime | नवऱ्याने गे असल्याचं लपवलं, हनिमूनवर बायकोला समजलं, ठाण्यातील 32 वर्षीय तरुण अडचणीत
मोहाडी शेतमजुराची आत्महत्या. Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 09, 2022 | 1:20 PM
Share

ठाणे : स्वतःची लैंगिक ओळख लपवून ठेवत नवविवाहित पत्नीची (Newly Wed Wife) फसवणूक केल्या प्रकरणी पतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे कोर्टाने 32 वर्षीय तरुणाचा अटकपूर्व जामीन अर्ज (Anticipatory Bail) फेटाळून लावला. आरोपी पतीने आपले समलिंगी संबंध पत्नीपासून लपवून ठेवल्याचा आरोप आहे. 29 वर्षीय पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये दोघांचा विवाह झाला होता. हनिमूनला (Honeymoon) असताना पत्नीला पतीच्या सेक्शुअल ओरिएंटेशन विषयी सत्य समजलं होतं. याशिवाय, लग्नाच्या वेळी खोटी कागदपत्रं दाखवून त्याने आपला पगार वार्षिक 14 लाख रुपये असल्याचंही खोटं सांगितलं होतं.

काय आहे प्रकरण?

स्वतःचे सेक्शुअल ओरिएंटेशन लपवून ठेवत नवविवाहित पत्नीला फसवल्या प्रकरणी ठाणे कोर्टाने आरोपी पतीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपी पतीने लग्नानंतरही समलिंगी संबंध कायम ठेवत ते पत्नीपासून लपवून ठेवल्याचा आरोप आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वेबसाईटवर यासंबंधी वृत्त देण्यात आलं आहे,

29 वर्षीय तक्रारदार तरुणी आणि 32 वर्षीय आरोपी तरुण यांचां लग्न नोव्हेंबर 2021 मध्ये झालं होतं. हनिमूनला गेले असताना पत्नीला पतीच्या सेक्शुअल ओरिएंटेशन विषयी समजलं.

मोबाईलमध्ये विचित्र चॅट

“जानेवारी 2022 मध्ये पतीचा मोबाईल फोन बघत असताना महिलेला तो काही जणांसोबत विचित्र व्हॉट्सअॅप चॅट करत असल्याचं आढळलं. महिलेने फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला. त्यामध्ये त्याचे समलैंगिक संबंध असल्याचं निष्पन्न झालं. तो अनेक गे डेटिंग अॅपही वापरत होता” असंही महिलेच्या वकिलाने कोर्टात सांगितलं.

याशिवाय, लग्नाच्या वेळी खोटी कागदपत्रं दाखवून त्याने आपला पगार वार्षिक 14 लाख रुपये असल्याचंही खोटं सांगितलं होतं.

नवऱ्याने चाकूने धमकावल्याचा आरोप

त्यानंतर महिलेने ठाण्यातील रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीने लग्नाच्या वेळी इतकी महत्त्वाची माहिती लपवली, शिवाय पत्नीला हे सर्व समजले, तेव्हा त्याने तिला चाकूने धमकावले, असा दावाही वकिलांनी केला. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश एस गुप्ता यांनी तरुणाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

संबंधित बातम्या :

शारीरिक संबंधांना नकार, महिलेला दुसऱ्या नवऱ्याची मारहाण, पहिल्या पतीच्या मुलाला सिगरेटचे चटके

 चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची हत्या, आत्महत्येचा बनाव, पोलिसांनी पितळ उघडं पाडलं

आधी चहात फिनेल, मग गुलाबजाममध्ये उंदीर मारायचं औषध; नवऱ्याच्या जीवावर उठलेली बायको गजाआड

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.