AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhule Theft : धुळ्यातील कापडणे यात्रोत्सवात चोरी, 10 ते 11 महिलांच्या गळ्यातील सोनपोत लंपास

कापडणे गावची ग्रामदेवता भवानी मातेचा यात्रोत्सव सुरु आहे. मात्र या यात्रोत्सवाला सोन साखळी चोरांचे ग्रहण लागले. यात्रोत्सवात आलेल्या साधारण 10 ते 11 महिलांचे 5 तोळे सोने असा एकूण 2 लाख रुपये किंमतीचा ऐवज अल्पवयीन सराईत चोरट्यांच्या टोळीने लंपास केला.

Dhule Theft : धुळ्यातील कापडणे यात्रोत्सवात चोरी, 10 ते 11 महिलांच्या गळ्यातील सोनपोत लंपास
धुळ्यातील कापडणे यात्रोत्सवात चोरीImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: May 08, 2022 | 4:44 PM
Share

धुळे : यात्रा उत्सवात आलेल्या 10 ते 111 महिलांच्या गळ्यातील सोनपोत चोरट्यांनी लंपास केल्याची घटना धुळ्यात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही चोरी (Theft) करणारे सर्व आरोपी अल्पवयीन मुले (Minor Accussed) आहेत. ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने या बालगुन्हेगारांना पकडून सोनगीर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच महिलांनी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. तर उर्वरीत महिलांनी घरच्या लोकांच्या भीतीने गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. (Dhule cloth theft during pilgrimage, theft of Mangalsutra of 10 to 11 women)

चोरी प्रकरणी अल्पवयीन चोरटे अटक

कापडणे गावची ग्रामदेवता भवानी मातेचा यात्रोत्सव सुरु आहे. मात्र या यात्रोत्सवाला सोन साखळी चोरांचे ग्रहण लागले. यात्रोत्सवात आलेल्या साधारण 10 ते 11 महिलांचे 5 तोळे सोने असा एकूण 2 लाख रुपये किंमतीचा ऐवज अल्पवयीन सराईत चोरट्यांच्या टोळीने लंपास केला. या प्रकाराने अनेक माहेरवाशिनी आणि सासरवाशिनी महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. साधारणतः 10 ते 11 महिलांचे सोनसाखळी लंपास झालेली आहे. सासरच्या मंडळीला घाबरून काही महिलांनी गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दाखवली तर उर्वरित पाच महिलांनी सोनगीर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुण्यातील खेड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यामधे 9 मोटारसायकलसह दोन लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामधे 7 गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली असून 3 आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून खेड, शिक्रापूर, चाकण, आळंदी, वडगाव मावळ व इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या एकूण 9 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. (Dhule cloth theft during pilgrimage, theft of Mangalsutra of 10 to 11 women)

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....