Dhule Honor Killing : धुळ्यात सैराटची पुनरावृत्ती, प्रेमसंबंधाच्या संशयावरून बहिणीची हत्या, अंत्यविधीही रात्रीच उरकला

| Updated on: Jun 17, 2022 | 8:36 PM

बहिणीचे प्रेमसंबंध होते आणि पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा संशय होता. यातूनच हट्टी गावाशिवारातील शिवमेंढा येथे रात्री 3 च्या सुमारास बहीण पुष्पा रमेश हालोर हिच्या अंगावरील साडीची लेस फाडून निंबाच्या झाडाला बांधून फास तयार केला. त्यानंतर तिला गळफास अडकवून फासावर लटकवले. त्यानंतर घरी जावून पुष्पा हिने स्वत:च्या हाताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासवून आई व मित्रांसह गावातील लोकांना खोटी माहिती दिली.

Dhule Honor Killing : धुळ्यात सैराटची पुनरावृत्ती, प्रेमसंबंधाच्या संशयावरून बहिणीची हत्या, अंत्यविधीही रात्रीच उरकला
धुळ्यात सैराटची पुनरावृत्ती
Image Credit source: TV9
Follow us on

धुळे : धुळ्यातील साक्री तालुक्यात निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. आपल्या 22 वर्षीय बहिणीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध (Love Affair) असून प्रियकरासोबत ती पळून जायच्या बेतात असल्याचा संशयातून भावानेच तिची हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भावाने आधी तिला मारहाण (Beating) केली, मग गळफास लावून हत्या केली. हत्या केल्यानंतर रात्रीच तिचा अंत्यविधी उरकून टाकण्यात आला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने संशयित भावास गजाआड केले आहे. संदिप रमेश हालोर असे आरोपी भावाचे नाव आहे. आरोपीला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपीने तरुणीला मारहाण करीत फासावर लटकवले

संदिप रमेश हालोर याने त्याची बहिण पुष्पा हिचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन तिला मारहाण करत गळफास लावला. तसेच रात्रीच तिचा अत्यंविधी आटोपून टाकला, अशी गोपनीय माहिती निजामपूर पोलिसांना मिळाली होती. या महितीनुसार निजामपूर पोलिस तपास पथकाने हट्टी गाव परिसरात रवाना होवून बातमीची खातरजमा केली असता आरोपी संदीप हालोर हा गावातच सापडला. दरम्यान पोलिसांनी त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

बहिणीला फासावर लटकवून आत्महत्या केल्याचे भासवले

बहिणीचे प्रेमसंबंध होते आणि पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा संशय होता. यातूनच हट्टी गावाशिवारातील शिवमेंढा येथे रात्री 3 च्या सुमारास बहीण पुष्पा रमेश हालोर हिच्या अंगावरील साडीची लेस फाडून निंबाच्या झाडाला बांधून फास तयार केला. त्यानंतर तिला गळफास अडकवून फासावर लटकवले. त्यानंतर घरी जावून पुष्पा हिने स्वत:च्या हाताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासवून आई व मित्रांसह गावातील लोकांना खोटी माहिती दिली. पहाटे 5 च्या सुमारास तिच्यावर घाईघाईत अंत्यसंस्कार देखील केले. अंत्यविधी करतेवेळी तिचे अंगावरील सर्व कपडे तसेच गळफास तयार केलेली साडीची लेस असे सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने दहनात टाकले. परंतु निजामपूर पोलिसांनी याचा संपूर्ण छडा लावत आरोपी भावाला गजाआड केले. आरोपीला साक्री न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (In Dhule brother killed sister on suspicion of having an affair)

हे सुद्धा वाचा