दिपाली सय्यद यांचे एक वाक्य आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ, पुण्यातील आंदोलनस्थळी काय घडले, वाचा..

Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest : पुण्यात एमपीएससीचे आंदोलन सुरू आहे. आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. पुणेकरांनी या आंदोलनाविरोधात हायकोर्टात धाव घेतली. त्यातच दिपाली सय्यद यांनी आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांची भेट घेतली. मात्र, त्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

दिपाली सय्यद यांचे एक वाक्य आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ, पुण्यातील आंदोलनस्थळी काय घडले, वाचा..
Dipali Sayyed
| Updated on: Oct 09, 2026 | 11:57 AM

पुण्यातील एस. एम. जोशी पुलाखाली एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या 9 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांसोबत आमदार रोहित पवारही आंदोलनाला बसले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आंदोलन करणार यावर विद्यार्थी ठाम आहेत. या आंदोलनात विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यदही आंदोलनस्थळी पोहोचल्या होत्या. मी एक कलाकार म्हणून या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आल्याचे दिपाली सय्यद यांनी म्हटले. हेच नाही तर यादरम्यान त्यांनी म्हटले की, येत्या दोन दिवसात तुमच्या मागण्या पूर्ण होतील. मात्र, ज्यावेळी दिपाली सय्यद या भाषणासाठी उभ्या राहिल्या, त्यावेळी गोंधळ झाला. दिपाली सय्यद यांना विद्यार्थी बोलू देत नव्हते. विद्यार्थ्यांनी गोंधळ करण्यास सुरूवात केली.

यावेळी दिपाली सय्यद यांच्याकरिता विद्यार्थी विवेकानंद पाटील पुढे आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली. दिपाली सय्यद यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅडव्होकेट आहेत. तुम्हाला नक्कीच न्याय देतील. दिपाली सय्यद यांचे हे शब्द ऐकताच विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. विद्यार्थ्यांनी त्यांना बोलू दिले नाही. परिस्थिती चिघळताना पाहून विवेकानंद पाटील यांनी तात्काळ मध्यस्थी केली.

Loading...

एकनाथ शिंदेंपर्यंत तुमचा आवाज पोहोचेल. एकनाथ शिंदे तुमचे काम करतील असे दिपाली सय्यद यांनी म्हटले. मी एक राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर एक कलाकार म्हणून तुमच्यात आल्याचे दिपाली सय्यद यांनी म्हटले. यावेळी विद्यार्थ्यांची समजूत काढत विवेकानंद पाटील यांनी म्हटले की, तुम्ही सरकारमध्ये अजूनही विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आलात.

आम्हाला अर्बन नक्षलवादी म्हटले गेले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राग आहे. तुम्ही आमचा आवाज पोहोचवा. आमचे इतक्या दिवसांपासून आंदोलन सुरू आहे पण आमच्याकडे एकही कलाकार आला नाही. तुम्ही आलात, असेही यादरम्यान बोलताना विवेकानंद पाटील यांनी म्हटले. आंदोलनस्थळी आल्याबद्दल आभार शेवटी विवेकानंद पाटीलने दिपाली सय्यद यांचे मानले. दिपाली सय्यद यांना अगोदर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us