AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस पोलिसांकडे असताना आदित्य ठाकरेंना CBI ची क्लीनचीट कशी? संजय निरुपम यांचा सवाल

लवकरच आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल होईल आणि ते हत्यादी ठाकरे बनतील, अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केस पोलिसांकडे असताना आदित्य ठाकरेंना CBI ची क्लीनचीट कशी? संजय निरुपम यांचा सवाल
aaditya thackeray disha salian sanjay nirupam
| Updated on: Mar 27, 2025 | 2:39 PM
Share

दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटीचे ड्रग्ज रॅकेट आहे. सतीश सालियन यांनी नव्याने केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदवला जाईल, असा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला. दिशा सालियन हत्याकांडात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका असल्याचे पुरावे आहेत, लवकरच आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल होईल आणि ते हत्यादी ठाकरे बनतील, अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नुकताच वडील सतीश सालियन यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे दिशा सालियन प्रकरणात तक्रार केली. या तक्रारीत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही तक्रार मालवणी पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर करण्यासाठी पुढे पाठवण्यात आल्याची माहिती निरुपम यांनी दिली. दिशा सालियनची ८ जून २०२० मध्ये हत्या झाली. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची दिशा सालियन मॅनेजर होती. दिशा सालियनची हत्या संशयास्पद झाली होती. या दिवशी दिशा सालियनच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये सर्वजण उपस्थित होते, अशी चर्चा त्या दिवशी झाली होती, असे निरुपम म्हणाले.

नव्याने सखोल चौकशी होणे आवश्यक

“राज्य सरकारने या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली असून त्याकडून चौकशी सुरु आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन हत्या केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला आहे. दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल तीन दिवस उशीराने प्राप्त झाला. तिचा मृतदेह हा इमारतीपासून २५ फूट लांब आढळून आला. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या आणि नग्नावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असून त्याची नव्याने सखोल चौकशी होणे आवश्यक आहे”, असे संजय निरुपम म्हणाले.

“सरकार विरोधी पक्षांचा बदला घेण्यासाठी दिशा सालियन प्रकरणाचे राजकारण करत आहेत, असा आदित्य ठाकरे यांचा आरोप खोटा आहे. आदित्य ठाकरेने सुप्रीम कोर्टात सीबीआयने क्लिन चीट दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाचा नाही तर सुशांत सिंग हत्येचा तपास केला होता. आदित्य यांच्या खोट्या प्रतिज्ञापत्रावर देखील कारवाई होईल”, असे निरुपम म्हणाले.

कुणाल कामराचे वादग्रस्त गाणे जाणुनबुजून व्हायरल

या प्रकरणी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया आणि इतरांवर संशय आहे. हे सर्व ड्रग्ज रॅकेटशी संबधित असून त्यांना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या समीर खान याने नार्कोटिस ब्युरोकडे कबुली दिली होती. आदित्य ठाकरे ड्रग्ज घेतो, असे समीर खानने चौकशीत म्हटले होते. त्यामुळे दिशा सालियनच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार, मुंबई पोलीस कटिबद्ध आहेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा वाढल्यानंतर उबाठा गटाने कुणाल कामराचे वादग्रस्त गाणे जाणुनबुजून व्हायरल करण्यात आले. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेवर कुणाल कामरावर निश्चित कारवाई होईल, असे संजय निरुपम यांनी म्हटले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?