दिशाप्रकरणात दादांचा मोठा गौप्यस्फोट; दिशा सालियान प्रकरणाचा उलघडा चंद्रकांत पाटील करणार; या दिवशी सादर करणार पुरावे

| Updated on: Feb 22, 2022 | 4:37 PM

दिशा सालियानचे हा वाद सुरु असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 7 मार्च नंतर दिशा सालियान प्रकरणाचा उलगडा करुन सर्व पुरावे सादर करणार असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दिशाप्रकरणात दादांचा मोठा गौप्यस्फोट; दिशा सालियान प्रकरणाचा उलघडा चंद्रकांत पाटील करणार; या दिवशी सादर करणार पुरावे
chandrakant Patil
Follow us on

कोल्हापूरः भाजप-शिवसेनेचा (BJP-SHIVSENA) आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चालू असतानाच आता दिशा सालियान (Disha Saliyan) प्रकरणाने आाता पुन्हा उचल खाल्ली आहे. दिशा सालियानविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) वक्तव्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल सादर कऱण्याचे आदेश दिले होते. दिशा सालियानचे हा वाद सुरु असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 7 मार्च नंतर दिशा सालियान प्रकरणाचा उलगडा करुन सर्व पुरावे सादर करणार असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिशा सालियान या प्रकरणाविषयी गौप्यस्फोट केल्यानंतर त्यांनी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आणणार असल्याचे सांगितले आहे. दिशा सालियान या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे हेही काही दिवसातच स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले आहे. दिशा सालियान प्रकरणावरुन चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

दिशा प्रकरणावरुन राजकारण भरकटले

सुशांतसिंग राजपूतची व्यवस्थापक राहिलेली दिशा सालियान हिच्या मृत्यूची चौकशी सीबीआय यंत्रणेमार्फत करण्यात यावी, मृत्यूपूर्वी ती गरोदर नव्हती आणि तिच्यावर बलात्कार झाला नव्हता असा अहवाल आल्यानंतरही असे असातानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिच्यावर बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे दिशा हिच्या मृत्यूनंतरही तिची बदनामी थांबली नाही, त्यामुळे तिची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली.

‘या’ प्रकरणाचा उलघडा होणार

राज्य महिला आयोगाकडे दिशा सालियान प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसाना चोवीस तासात दिशा सालियान प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दिशा सालियान प्रकरणावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली आहे आणि त्यांनी 7 मार्च नंतर दिशा सालियान प्रकरणाचा उलगडा करुन सर्व पुरावे सादर करणार असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता काय वळण लागणार हे 7 मार्चलाच समजणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणावरून केलेली वक्तव्य दुर्देवी असल्याची मतं राजकीय वर्तुळातून व्यक्त होत असतानाच आता चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाचा उलघडा होणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये काय तथ्य आहे की, राज्य महिला आयोग आता याबाबत काय निर्णय घेणार ते आता पोलिसांच्या तपासानंतरच कळणार आहे.

संबंधित बातम्या

संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल नाही करणार, महामंडळ काय म्हणालं?

VIDEO | दिशाची आई म्हणते, आम्हालाही जगावं वाटत नाही, आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार!

VIDEO: नक्षलवाद्यांच्या धमक्या येतात, माझ्यावर परिणाम होत नाही, मी फक्त काम करत राहतो: एकनाथ शिंदे