AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंची साथ सोडताच ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका, थेट राणा जगजीत सिंह पाटील..

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून सोडचिठ्ठी घेतली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्याकरिता होता. यादरम्यानच आता मोठ्या घडामोडी वाढताना दिसत आहेत.

उद्धव ठाकरेंची साथ सोडताच ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका, थेट राणा जगजीत सिंह पाटील..
Omraje Nimbalkar and Rana Jagjit Singh Patil
| Updated on: Jun 25, 2026 | 9:24 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट तयार झाली. यानंतर पक्षाने व्हिप जारी करून आपल्या खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या खासदारांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शवली. ज्यानंतर या खासदारांवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. ओमराजे निंबाळकर यांनीही ठाकरे गटाची साथ सोडली. हा ठाकरेंना थेट धक्का होता. वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमधील निकाल आपल्या बाजूने लागला नाही, त्यानंतर ओमराजे निंबाळकर थेट धाराशिवमध्ये पोहोचले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत जाहीर केले की, आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहोत.

यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याकडून ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. आता उद्धव ठाकरे धाराशिव दाैऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान 18 कोटीच्या निधीवरून धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजीत सिंह पाटील यांच्या श्रेयवाद पेटला आहे. दोघांकडूनही सोशल मीडियावर पत्रकबाजी आणि महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.

ओमराजे निंबाळकर यांनी पक्षप्रवेश करताच धाराशिव नगरपालिकेला 18 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं सांगितलं. दुसरीकडे यापूर्वीच आम्ही पाठपुरावा करून तो निधी घेतलाय, असा दावा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय. ओमराजे निंबाळकर महायुतीमध्ये गेले तरी पाटील निंबाळकर वाद कायम राहणार का? अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

शहरातील आठवडी बाजार विकसित करणे -8 कोटी रुपये, राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करणे -5 कोटी रुपये, छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे -3 कोटी रुपये, बाळासाहेब ठाकरे उद्यान विकसित करण्यासाठी -2 कोटी रुपये असा एकूण 18 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. आता त्यावरूनच जोरदार वाद पेटल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?