AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chitra Wagh : भाऊबीजेला प्रसाद लाड यांना ओवाळल्यानंतर चित्रा वाघ यांचं सूचक राजकीय भाष्य VIDEO

"महाविकास आघाडीने एकत्र यावे किंवा नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसबरोबर राज ठाकरे जातील हे मला नाही वाटतं. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. निश्चितपणे आमचा महापौर बसेल" असं प्रसाद लाड म्हणाले. "प्रसाद दादा यांनी अनेक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. त्याला देवा भाऊ चांगली जबाबदारी नक्कीच देतील. मंत्रिपदावर देखील माझा भाऊ जाईल" अशी इच्छा चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.

Chitra Wagh : भाऊबीजेला प्रसाद लाड यांना ओवाळल्यानंतर चित्रा वाघ यांचं सूचक राजकीय भाष्य VIDEO
Prasad lad-Chitra Wagh
| Updated on: Oct 23, 2025 | 1:31 PM
Share

सर्वसामान्यांप्रमाणे राजकीय जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींची सुद्धा काही नाती असतात. सणावाराच्या निमित्ताने ती नाती जपली जातात. आज देशात सर्वत्र भाऊबीज साजरी होत आहे. त्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातही भाऊबीजेचा सण साजरा होतोय. आमदार चित्रा वाघ आणि प्रसाद लाड दोघांनी आज भाऊबीज साजरी केली. दोघेही भारतीय जनता पार्टीत आहेत. याआधी हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते. भावाला म्हणजे प्रसाद लाड यांना ओवाळल्यानंतर मीडियाशी बोलताना चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर भाऊबीजेच्या निमित्ताने राजकीय भाष्य केलं.

“आज आमच्या देवाभाऊंमुळे दोन भाऊ एकत्र येत आहेत. आपल्या सगळ्यांचे वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वरुन देवाभाऊंना आशिर्वादच देत असतील. तुमच्यामुळे, लोकांना दाखवण्यासाठी का असेना, राजकारणासाठी का असेना, पण आज हे दोघे एकत्र आलेले आहेत. मला तर सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या बहि‍णींसाठी आहे. खरोखर देवाभाऊंचे आभार मानले पाहिजेत, ज्या बहिणी इतकी वर्ष भावाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी वंचित होत्या. या आज त्या ठिकाणी आहेत” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

‘आमचे नाते रक्ताच्या पलीकडचे’

“आमच्या नात्याला कोणाची दृष्ट लागू नये. आनंदाचा क्षण आहे. ही नाती बळ देतात. पवित्र नातं आहे. आमचे नाते रक्ताच्या पलीकडचे आहे. आम्हाला आनंद आहे. आज माझा परिवार त्याला घ्यायला खाली गेला. माझ्या सोबत हा असतो. आमच्या नात्यात कधी खंड पडला नाही. दिखावेपणाचं नाटक केलं नाही” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

निवडणूक भाजप म्हणून नाही श्रमिक म्हणून लढलो

‘माझ्यासाठी ही आनंदाची दिवाळी आहे. ताईची आमदार म्हणून पहिली दिवाळी आहे’ असं प्रसाद लाड म्हणाले. “मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल. आम्हाला आव्हानच नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच शिवसेना. मागची एक निवडणूक छोटी होती. बेस्ट निवडणुकीत मी एकटा लढलो. मुंबईची जनता सुशिक्षित जनता आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही केले.यावेळी 31 हजाराचा बोनस मिळाला आहे. ठाकरे ब्रँडचं आव्हान नाही. आम्ही निवडणूक लढवत असताना भाजपा नाही, श्रमिक म्हणून लढलो. मला वाटते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उभी केली, त्याला मदत देवाभाऊ यांनी केली” असं प्रसाद लाड म्हणाले.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.