डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती, महाराष्ट्रात ठिकठिकाणी जल्लोष; अमित शाहांचे ट्वीट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त देशभर उत्साहात साजरे केले जात आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हरियाणा दौऱ्यावर विकासकामांचे उद्घाटन करण्यात येत आहे. वरळी-वांद्रे सागरी सेतूवर लेझर लायटिंग, फटाके आणि मिरवणुका यांचे आयोजन झाले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणा दौऱ्यावर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान विकासाशी संबंधित अनेक उपक्रमांचा ते शुभारंभ करणार आहेत. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळी ते वांद्रे सागरी सेतूवर लेझर लायटिंग करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी फटाक्यांची आतेषबाजी, मिरवणुकांचेही आयोजन करत भीम जन्मोत्सवाचा जल्लोष केला जाणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती पार पडत आहे. या निमित्त वरळी ते वांद्रे सागरी सेतूच्यामध्ये लेझर लायटिंग करण्यात आली आहे. या सागरी सेतूवर एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला अशोक चक्र आणि संविधान यांची प्रतिकृती विद्युत रोषणाईद्वारे करण्यात आली आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीमध्येही मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
जळगावात 44 ठिकाणी मिरवणूक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण महाराष्ट्रात जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने जळगाव शहरांमध्ये तब्बल 44 मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ठिकाणचे कार्यक्रम तसेच मिरवणूक शांततेत पार पाडाव्यात, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे. सर्वांनी आनंदात आणि शांततेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे .
नांदेडमध्ये भीमसैनिकांचा जल्लोष
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती नांदेडमध्ये उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मध्यरात्री बारा वाजता नांदेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आकृती पुतळा परिसरात हजारो भीमसैनिकांनी एकत्रित येत जल्लोष केला. यावेळई फटाक्याची आतिषबाजी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
अमित शाहांकडून अभिवादन
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. शिक्षण, समानता आणि न्यायाच्या बळावर सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे बाबासाहेब भीमराव आंबेडकर आयुष्यभर वंचितांच्या हक्कांसाठी वचनबद्ध राहिले. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या तत्वांवर आधारित संविधान तयार करून त्यांनी भारताच्या महान लोकशाही वारशाचा मजबूत पाया रचला. न्याय्य आणि समतावादी समाज निर्माण करण्याच्या दिशेने बाबासाहेबांचे विचार आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतात”, असे अमित शाह म्हणाले.
शिक्षा, समानता और न्याय के बल पर सामाजिक क्रांति की नींव रखने वाले बाबासाहेब भीमराव अंबेडकर जी आजीवन वंचितों के अधिकारों के लिए कटिबद्ध रहे। समता, स्वतंत्रता और बंधुत्व पर आधारित संविधान की रचना कर उन्होंने भारत की महान लोकतांत्रिक विरासत को सुदृढ़ आधार प्रदान किया। न्यायपूर्ण और… pic.twitter.com/jRiFdatUEr
— Amit Shah (@AmitShah) April 14, 2025
“संविधानाचे महान शिल्पकार आणि लाखो देशवासीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेले बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो”, असेही अमित शाहांनी म्हटले.
