तुम्हीही रस्त्यावरील बर्फ टाकलेलं सरबत पिताय, तर सावधान!

रत्नागिरी : उन्हाळ्यात अंगाची काहिली कमी करण्यासाठी अनेकजण उघड्यावरील थंड सरबत पितात. या सरबतात किंवा शीतपेयांमध्ये बर्फ टाकलेला असतो. तुम्हीही अशाप्रकारे रस्त्यावर बर्फ टाकलेले सरबत पिताय, तर सावधान. कारण, हा बर्फ तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. नुकतंच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवाईत सरबत विक्रेत्यांकडील तसेच, हॉटेलमध्ये वापरण्यात येणारा बर्फ हा दूषित पाण्यापासून तयार करण्यात …

तुम्हीही रस्त्यावरील बर्फ टाकलेलं सरबत पिताय, तर सावधान!

रत्नागिरी : उन्हाळ्यात अंगाची काहिली कमी करण्यासाठी अनेकजण उघड्यावरील थंड सरबत पितात. या सरबतात किंवा शीतपेयांमध्ये बर्फ टाकलेला असतो. तुम्हीही अशाप्रकारे रस्त्यावर बर्फ टाकलेले सरबत पिताय, तर सावधान. कारण, हा बर्फ तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. नुकतंच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवाईत सरबत विक्रेत्यांकडील तसेच, हॉटेलमध्ये वापरण्यात येणारा बर्फ हा दूषित पाण्यापासून तयार करण्यात येत असल्याचे स्पष्ट झालं आहे.

रत्नागिरीतील सहा बर्फाच्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकली. या कारवाईत सरबत विक्रेत्यांकडे तसेच हॉटेलमध्ये वापरण्यात येणारा बर्फ हा दूषित पाण्यापासून तयार करण्यात येत असल्याचं स्पष्ट झालं. रत्नागिरीतील पेठकिल्ला येथील सहा कारखान्यांवर ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी बर्फ तयार करण्याची प्रक्रिया बघून एफडीए अधिकाऱ्यांच्या पायखालची जमिनीच सरकली.

कशी तयार होते बर्फाची लादी?

पांढऱ्याशुभ्र बर्फाची लादी पाहून उन्हाळ्यात अनेकजण त्याकडे आकर्षित होतात. उन्हाळ्यात हाच बर्फ शीतपेयांमध्ये वापरला जातो. अनेक नागरिक त्याचा आस्वादही घेतात. मात्र, शीतपेयांमध्ये वापरण्यात येणारा हा बर्फ गंजलेल्या भांड्यात तयार करण्यात येतो. त्यासाठी वापरण्यात येणारे पाणी दूषित असते. तसेच, बर्फ तयार करण्यात येणारे कारखाने अतिशय गलिच्छ असतात. धक्कादायक म्हणजे बर्फ तयार झाल्यानंतर बर्फ काढतेवेळी कामगार त्याच्यावर पाय देतात आणि मग तो बर्फ काढतात. हे सर्व वाचून धक्का बसला ना, पण हे खरं आहे! एफडीएने केलेल्या कारवाईत या गोष्टी उघड झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील अन्न व औषध प्रशासनाला गलिच्छ आणि अस्वच्छतेत बर्फ बनवला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, एफडीएने बर्फ तयार करण्यात येणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली. त्यावेळी किप्टन, एच डी नाईक, अलफलाह, कोकण मरिन प्रोडक्ट आणि अलिम अरफाद या कारखान्यांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणानंतर या करखान्यांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश एफडीएने दिले.

दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. गार वाटावं यासाठी बाजारातील बर्फ घातलेले शीतपेय आपण बिनधास्त पितो. पण, सरबतामध्ये टाकला जाणारा हा बर्फ कसा तयार केला जातो, हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांनुसार, पांढरा रंग असलेल्या बर्फाची लादी खाण्यासाठी वापरण्यात येते. तर निळा रंग असलेल्या बर्फाची लादी ही इतर कामासाठी वापरली जाते. निळा रंग वापरुन तयार करणार बर्फ खाण्या-पिण्यासाठी वापरण्यावर बंदी आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या या नियमाचं कुणीही पालन करत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात रस्त्यावरील सरबतात किंवा शीतपेयांमध्ये बर्फ घालून पिण्याचा मोह टाळा. कारण हा बर्फ तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *