AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोसोबत वाद, पतीन चार मुलांसह उचललं टोकाचं पाऊल, विहिरीत उडी मारुन संपवलं आयुष्य

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, वडिलांनी आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

बायकोसोबत वाद, पतीन चार मुलांसह उचललं टोकाचं पाऊल, विहिरीत उडी मारुन संपवलं आयुष्य
| Updated on: Aug 16, 2025 | 8:15 PM
Share

अहिल्यानगरमधून ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे,  बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार अपत्यांसह आपलं जीवन संपवलं आहे. अरुण काळे ( वय 30 वर्ष ) राहणार चिखली कोरेगाव , तालुका श्रीगोंदा असं आत्महत्या केलेल्या या व्यक्तीचं नाव आहे. अरुण काळे यांनी आधी आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून मग स्वत: आमहत्या केल्याचं समोर आलं आहे, या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातील कोहाळे शिवरात घडली आहे. अरुण काळे यांनी आधी आपल्या चार आपत्यांना विहिरीत ढकललं आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार बायको नांदायला येत नाही, म्हणून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी आपली एक मुलगी आणि तीन मुलांसह आत्महत्या केली आहे.

शिवानी अरुण काळे ( वय 8 ) , प्रेम अरुण काळे ( वय 7 ) वीर अरुण काळे ( वय 6 ) , कबीर अरुण काळे ( वय 5 ) अशी या घटनेतील मृतांची नावं आहेत. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे. एक पाय आणि एक हात दोरीने बांधलेल्या अवस्थेमध्ये अरुण काळे यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे.

बायकोसोबत वाद 

समोर आलेल्या माहितीनुसार अरुण काळे यांचा आठ दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीशी वाद झाला होता, या वादामुळे त्यांची पत्नी आठ दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी येवला येथे गेली होती. मात्र बायको घरी येत नसल्यानं त्यांनी टोकाचं पाऊल उचल्याची माहिती समोर येत आहे, आधी त्यांनी आपल्या चारही मुलांना विहिरीत ढकललं आणि नंतर त्यांनी विहिरीत उडी घेतली असावी असा अंदाज आहे.

दरम्यान  विहिरीपासून काही अंतरावर काळे यांची मोटर सायकल आढळली आहे. श्रीगोंदा येथून अरुण काळे हे आपल्या चार मुलांसह मोटारसायकलवर राहाता तालुक्यातील को-हाळे शिवारात आले होते,  को-हाळे शिवारात शिर्डी – नगर बायपासच्या कडेला मोटरसायकल लावून ते विहिरीपर्यंत गेले असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...