जालन्यात फक्त 20 जणांमध्ये लग्न लागणार, जास्त लोक जमल्यास कारवाई; कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जालना जिल्ह्यात लग्न समारंभात फक्त 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे. (corona pandemic jalna district collector marriage)

जालन्यात फक्त 20 जणांमध्ये लग्न लागणार, जास्त लोक जमल्यास कारवाई; कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सांकेतिक फोटो

जालना : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोनाची (Corona) दुसरी लाट येते की काय याची धास्ती अनेकांनी धरली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांत कडक निर्बंध घलण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातही कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येथील जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade) यांनी नव्याने कडक निर्बंध लागू केले आहेत. नव्या निर्बंधानुसार जिल्ह्यात लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी फक्त 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, नगरपरिषद हद्दीतील हॉटेल, चहा हॉटेल, खानावळी, बार, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे नवे आदेश 31 मार्चपर्यंत लागू असतील. (due to Corona Pandemic Jalna district collector imposes new law and allowed only 20 people in marriage)

लग्न समारंभात फक्त 20 जणांना परवानगी

जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्या अशीच वाढली तर आगामी काळात कोरोनावर नियंत्रण ठेवणे मुश्कील होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील जिल्हाधिकाऱ्यांनी नवे कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. नव्या नियमांनुसार यानंतर लग्नसमारंभास फक्त 20 जणांनाच जमण्यासाठी परवानगी असेल. 20 पेक्षा जास्त नागरिकांनी लग्नसमारंभात भाग घेतल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, जिल्ह्यातील नगरपरिषद, नगर पंचायत हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रात्री 7 वाजेनंतर बंद ठेवण्यात येणार आहेत.

धार्मिक सभा, मिरवणूक, रॅली बंद

जालना शहरातील सर्व दुकानदारांनी दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील व्यायामशाळा, जीम पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात धार्मिक सभा, राजकीय सभा, रॅली, मिरवणूक, धरणे, मोर्चे आंदोलनं तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांवरसुद्धा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. वरील आदेश हे 31 मार्च पर्यंत लागू राहतील. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी तसे आदेश दिले आहेत.

दरम्यान, राज्यात आज 13,659 नवे कोरोना रुग्ण सापडले.  आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 22,52,057 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 99,008 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.21% पर्यंत खाली आले आहे. तर दिवसभरात राज्यात 54 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

इतर बातम्या :

विश्वास नांगरे पाटील शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

सात दिवसांत कांदा 21 रुपये प्रतिकिलो स्वस्त; नेमकं असं काय घडलं?

INS Karanj : कलवरी श्रेणीतील INS करंज पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल

(due to Corona Pandemic Jalna district collector imposes new law and allowed only 20 people in marriage)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI