रायगडमध्ये डमी उमेदवारांमुळे सुनील तटकरे आणि अनंत गीतेंची चिंता वाढली

रायगड : डमी उमेदवारांमुळे रायगड मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या दोघांच्याही नावाचे उमेदवार निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे मतविभाजन होऊन फटका बसण्याची भीती आहे. गेल्या निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. सुनील तटकरे हे केवळ दोन हजार मतांनी पराभूत झाले होते. शिवसेनेचे उमेदवार अनंत …

रायगडमध्ये डमी उमेदवारांमुळे सुनील तटकरे आणि अनंत गीतेंची चिंता वाढली

रायगड : डमी उमेदवारांमुळे रायगड मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या दोघांच्याही नावाचे उमेदवार निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे मतविभाजन होऊन फटका बसण्याची भीती आहे. गेल्या निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. सुनील तटकरे हे केवळ दोन हजार मतांनी पराभूत झाले होते.

शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या नावाचाही उमेदवार रायगडमधून उभा आहे. अनंत गीते विरुद्ध अनंत गीते अशी लढत होणार आहे. अनंत पद्मा गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. तर आता राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्या विरोधात अजून दोन सुनील तटकरे आहेत.

सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. याआधी 2014 ला सुनील तटकरे विरुद्ध सुनील तटकरे असा अर्ज भरला गेला होता. त्यामुळे यावेळीही तिच राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे. अनंत गीते आणि सुनील तटकरे या दोघांचीही डमी उमेदवारांमुळे चिंता वाढली आहे.

रायगड मतदारसंघासाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 14 जागांसाठी मतदान होईल. लोकसभेचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *