E-Passport: नाशिकमध्ये तयार होणार देशभरातील सर्व ई-पासपोर्ट; केंद्र सरकारचा काय आहे निर्णय?

नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसने चाचणीकरिता 20 हजार ई-पासपोर्ट बनवून दिले आहेत. यापुढे दिवसाला 50 हजार ई-पासपोर्ट बनवण्यात येणार आहेत. त्यामुळे देशभरातील जवळपास 25 ते 30 कोटी पासपोर्ट बनवण्याचे काम इंडिया सिक्युरिटी प्रेसला मिळणार आहे.

E-Passport: नाशिकमध्ये तयार होणार देशभरातील सर्व ई-पासपोर्ट; केंद्र सरकारचा काय आहे निर्णय?
E-Passport
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 12:25 PM

नाशिकः एक अतिशय महत्त्वाची बातमी. आता देशभरातील सर्व ई-पासपोर्ट (E-Passport) हे नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये (India Security Press) बनणार आहेत. तशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात केलीय. आतापर्यंत नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसने चाचणीकरिता 20 हजार ई-पासपोर्ट बनवून दिले आहेत. यापुढे दिवसाला 50 हजार ई-पासपोर्ट बनवण्यात येणार आहेत. त्यामुळे देशभरातील जवळपास 25 ते 30 कोटी पासपोर्ट बनवण्याचे काम इंडिया सिक्युरिटी प्रेसला मिळणार आहे. मार्च महिन्यात हे काम सुरू होईल, अशी माहिती नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. जाणून घेऊयात केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयाचे नाशिककरांसह सर्वांवर कसे परिणाम होणार आहे ते.

निर्णय यापूर्वीच

केंद्र सरकारने पासपोर्टची सुरक्षा आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे आता अत्याधुनिक चिपच्या मदतीने ई-पासपोर्ट तयार केला जाणार आहे. हा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. या निर्णयावर काल मंगळवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शिक्कामोर्तब केले.

खासदारांंकडून स्वागत

ई-पासपोर्ट प्रणाली सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर नाशिकमध्ये या पासपोर्ट छपाई व्हावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला होता. दरम्यान, नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कसा असेल ई-पासपोर्ट?

केंद्र सरकारने ई-पासपोर्टमध्ये सुरक्षेला जास्त महत्त्व दिले आहे. त्यामुळे पासपोर्टमधील कुठलिही माहिती लिक होणार नाही. त्यावरील डिजिटल स्वाक्षरी सुद्धा सुरक्षित राहील. यासाठी एक विशेष अशी चिप या पासपोर्टमध्ये बसवण्यात येणार आहे. या पासपोर्टशी कोणी छेडछाड केली, तर त्याची माहिती संबंधित यंत्रणेपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे या पासपोर्ट गैरवापर टळणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दोन हजारांच्या नोटा चलनात आल्यानंतर त्याची छपाईही नाशिकमध्येच झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा एक महत्त्वाच्या कामाची धुरा नाशिकवर येऊन पडली आहे.

इतर बातम्याः

Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…

टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?

Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.