Earthquake: कोयना परिसरात भुकंपाचे सौम्य धक्के; तीव्रता 3 रिश्टर स्केल ; केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैॠत दिशेस

| Updated on: Jul 22, 2022 | 2:46 PM

भुकंपाचा केंद्र बिंदू कोयना खोऱ्यात हेळवाक गावच्या नैऋत्य दिशेला सात किलोमीटरवर असल्याचे सांगण्यात आले आहे. कोयनाखोऱ्यात जाणवलेल्या भुकंपाची जमिनीतील खोली 9 किलोमीटर आहे.

Earthquake: कोयना परिसरात भुकंपाचे सौम्य धक्के; तीव्रता 3 रिश्टर स्केल ; केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैॠत दिशेस
Follow us on

साताराः कोयनानगर परिसरात (Koynagar Area) भुकंपाचा (Earthquake) सौम्य धक्के जाणवल्याची घटना आज दुपारी 1वाजता घडली. हे धक्के 3 रिश्टर स्केलचा (3 Richter scale) सौम्य भुकंपाचा धक्का जाणवला असल्याचे सांगण्यात आले आहे. भुकंपाचा केंद्र बिंदू कोयना खोऱ्यात हेळवाक गावच्या नैऋत्य दिशेला सात किलोमीटरवर असल्याचे सांगण्यात आले आहे. कोयनाखोऱ्यात जाणवलेल्या भुकंपाची जमिनीतील खोली 9 किलोमीटर असून या भुकंपामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचे प्राथमिक माहिती सांगण्यात आली आहे.

भुकंपाचा धक्का हा 3 रिश्टर स्केल

कोयना परिसरात वारंवार भुकंपाचे धक्के जाणवत असतात, कमी जास्त रिश्टर स्केलचे हे प्रमाण असले तरी या परिसरात कोयना धरण असल्याने धरणाला कोणतीही हानी पोहचली आहे का त्याचीही तपासणी आधी केली जाते. ही घटना दुपारी 1 वाजता घडल्यानंतर या भुकंपाचा धक्का हा 3 रिश्टर स्केलचे भुकंपमापन केंद्राकडून स्पष्ट केले आहे.

भुकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक

कोयना परिसरातील झालेल्या या भुकंपाचा केंद्रबिंदू हा कोयना खोऱ्यातील हेळवाक गावच्या नैऋत्य दिशेला सात किलोमीटरवर आहे. कोयनाखोऱ्यात जाणवलेल्या भुकंपाची जमिनीतील खोली 9 किलोमीटरवर असून या भुकंपामुळे कोणतीही हानी झाली नाही अंसही यावेळी सांगण्यात आली आहे.

 केंद्रबिंदूची खोली 9 किमी

कोयना परिसरात या घटनेचीम माहिती कळताच कोयना परिसर हादरला. कोयनानगर येथील भूकंपमापन केंद्रावर या सौम्य भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली असून याची तीव्रता 3.00 रिश्टर स्केल इतकी होती असंही भूकंपमापन केंद्रावरून सांगण्यात आले. भुकंपाच्या केंद्रबिंदूची खोली 9 किमी इतकी असुन भुकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैॠत दिशेस 7 किमी वर व कोयनानगरपासुन 12 किमी अंतरावर होता. भुकंपाचा धक्का कोयना परिसरात जाणवला.

कोयना धरण सुरक्षित

या भुकंपाचा धक्क्याने कोयना धरण सुरक्षित असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे. भुकंपाच्या या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाली नसून धरण परिसरही सुरक्षित आहे.