ईडीकडून झाडाझडती, चौकशीचे तीन टप्पे, दुसरा टप्पा अजित पवार, तिसरा टप्पा शरद पवार, पहिला कोण?

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ED) यांच्यावरही ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे.

ईडीकडून झाडाझडती, चौकशीचे तीन टप्पे, दुसरा टप्पा अजित पवार, तिसरा टप्पा शरद पवार, पहिला कोण?

नवी दिल्ली : राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ED) यांच्यावरही ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासोबत (Sharad Pawar ED) पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (money laundering ajit pawar) यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मनी लाँडरिंग अर्थात पैशाची अफरातफर/आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे.

ईडीकडून झाडाझडती, चौकशीचे तीन टप्पे

दरम्यान, 25 हजार कोटी रुपयांच्या कथित राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणाची चौकशी तीन टप्प्यात होणार असल्याची माहिती, सूत्रांनी दिली.

पहिल्या टप्प्यात तक्रारदार आणि बँक अधिकाऱ्यांसह काही साखर कारखानदारांची चौकशी ईडीकडून होऊ शकते.

तपासाच्या दुसऱ्या टप्प्यात अजित पवार यांना चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे.  तर तिसऱ्या टप्प्यात खुद्द शरद पवारांना चौकशीसाठी पाचारण केलं जाऊ शकतं.

पवारांचं नाव कुणी घेतलं?

आतापर्यंतच्या चौकशीत शरद पवारांचं नाव आल्याने शिखर बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली.  याप्रकरणाशी संबंध असलेल्या एका व्यक्तीने शरद पवारांचं नाव सांगितल्याने, त्यांचं नाव या प्रकरणात आलं आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्यात शरद पवार आणि अजित पवार यांची भूमिका काय हे चौकशीदरम्यान जाणून घेतलं जाऊ शकतं.

इतकंच नाही तर याप्रकरणातील अनेकांवर अटकेचीही कारवाई ईडी करु शकतं.

शरद पवारांवर गुन्हा

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (money laundering sharad pawar) यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झालाय. त्यांच्यासोबत पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (money laundering ajit pawar) यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मनी लाँडरिंग अर्थात पैशाची अफरातफर/आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या 

पवार काका-पुतण्यांवर ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा  

शिखर बँक घोटाळा : अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यास नकार 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *