AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही आम्हाला डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ, ED च्या कारवाईनंतर आव्हाडांचा BJP ला इशारा

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईडी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा पद्धतीचे प्रयत्न चुकीचे, तुम्ही आम्हाला डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ, असा कडकडीत इशाराच जिंतेंद्र आव्हाड यांनी भाजपला दिला आहे.

तुम्ही आम्हाला डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ, ED च्या कारवाईनंतर आव्हाडांचा BJP ला इशारा
जितेंद्र आव्हाडांचा भाजपला इशाराImage Credit source: tv9
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 22, 2022 | 7:34 PM
Share

मुंबई : राज्यात ईडीची जी कारवाई (ED raid)  सुरू आहे. त्यावरून पुन्हा जोरदार रान पेटलं आहे. पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याची (Cm uddhav thackeray) संपत्ती ईडीने जप्त केल्यानेतर महाविकास आघाडीची नेते अधिकच आक्रमक झाले आहेत(Shridhar patankar) . यावरूनच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईडी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा पद्धतीचे प्रयत्न चुकीचे, तुम्ही आम्हाला डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ, असा कडकडीत इशाराच जिंतेंद्र आव्हाड यांनी भाजपला दिला आहे. आम्ही कोसळणार नाही, जनतेला कसं सुडाचे राजकारण सुरू आहे ते दिसतंय, असे म्हणत आव्हाडांनी भाजपला टार्गेट केलंय. तर जिथे जळतं तिथेच धूर येतो ही कारवाई योग्यच आहे. असे भाजप नेते सांगत आहेत.

पाहुण्यांच्या स्वागताची तयारी ठेऊ

ईडीचे पाहुणे सर्वांच्या घरी जायला लागले आम्ही सगळीकडे पाहुण्यांच्या स्वागताची सोय करून ठेवू, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अनिल देशमुखांच्या घरच्या नव्वद धाडी पडल्या, काही मिळालं नाही यातून, असे म्हणत ईडी मुद्दाम जामीन न मिळण्यासारखे गुन्हे दाखल करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. या कारवाईनंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांना रात्री झोप लागणार नाही, असा टोलाही सोमय्या यांनी लगावालाय.

राऊतांचाही भाजपला इशारा

ईडीच्या या कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाटणकरांवरील कारवाई म्हणजेच ठाकरे कुटुंबावरील हल्ला आहे. महाराष्ट्र ठाकरे कुटुंबाला ओळखतो. याची किंमत आज ना उद्या तुम्हाला चुकवावी लागेलच, असा इशारा देतानाच ईडीच्या कारवाई ही तर खरतनाक हुकूमशाहीची सुरुवात आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी चढवला आहे. श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी भाजप सरकारवर संताप व्यक्त करतानाच भाजपला सज्जड इशाराही दिला आहे.

‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर देशासमोरील मोठा प्रश्न’, पाटणकरांवरील कारवाईनंतर शरद पवारांचा घणाघात

Rashmi Thackeray Brother: कुणी कुणाचा पैसा कसा वळवला? रश्मी ठाकरेंच्या भावाची EDनं सांगितलेली Modus Operandi

ED Raid : ‘उद्धव ठाकरेंना रात्री झोप येणार नाही’, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश