ED Raid : ‘उद्धव ठाकरेंना रात्री झोप येणार नाही’, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

ईडी कारवाईनंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांना रात्री झोप लागणार नाही, असा टोलाही सोमय्या यांनी लगावालाय.

ED Raid : 'उद्धव ठाकरेंना रात्री झोप येणार नाही', मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्या यांची उद्धव ठाकरेंवर टीकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 6:43 PM

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना ईडीने मोठा दणका दिलाय. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. याची किंमत जवळपास 6 कोटी 45 लाख रुपये इतकी आहे. ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे. या कारवाईनंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांना रात्री झोप लागणार नाही, असा टोलाही सोमय्या यांनी लगावालाय.

‘उद्धव ठाकरे साहेब उत्तर देऊ शकणार नाहीत’

गेल्या दोन वर्षात चौकशा सुरु होत्या. छगन भुजबळांनी ज्या कंपन्यांकडून मनी लॉन्ड्रिंग केलं त्याच कंपन्यांकडून श्रीधर पाटणकर यांनी मनी लॉन्ड्रिंग गेलं. एक स्पष्ट करतो, ही तर फक्त सुरुवात आहे. तु्म्ही बघा उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई महापालिकेला फक्त लुटण्याचं काम केलं आणि आता महाराष्ट्राला लुटत आहेत. ही माफिया सेना आहे. जे डर्टी डझन मी सांगितले त्या डर्टी डझनचा हिशेब आम्ही जनतेसमोर ठेवणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिलाय. श्रीधर पाटणकरच्या खात्यातून जे पैसे गेले आहेत, ते समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब उत्तर देऊ शकणार नाहीत, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी केलाय.

‘उद्धव ठाकरेंना रात्री झोप लागणार नाही’

उद्धव ठाकरे माफिया सेनेनं जी लुटमार चालवली आहे. त्या लुटमारीचा हिशेब जनतेसमोर ठेवण्याचं काम मी करतोय. अजून तर ही सुरुवात आहे. पुढचा हिशेब येईल तेव्हा कळेल. किती मनी लॉन्ड्रिंग केलं हे श्रीधर पाटणकरांनी घोषित करावं नाहीतर पुढच्या कारवाईला तयार राहावं. ज्या कंपन्यांतून पैसे घेतले ते पैसे पुढे कुठे गेले? असा सवाल करतानाच उद्धव ठाकरेंना रात्री झोप येणार नाही, असा खोचक टोला सोमय्या यांनी लगावलाय.

इतर बातम्या :

ED Raid : मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला ईडीचा मोठा दणका, ठाण्यातल्या 11 सदनिका सील

‘राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा फायदा घेतेय’, मावळमधून पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर बारणे आक्रमक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.