AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांना झटका, एका अंड्याची विक्री 20-25 रुपयांना होणार? बाजारात नेमकं काय बिघडलं?

सर्वसामान्यांना झटका बसण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात एका अंड्याची विक्री 20-25 रुपयांना होण्याची शक्यता आहे. बाजारात नेमकं बिघडलं?

सर्वसामान्यांना झटका, एका अंड्याची विक्री 20-25 रुपयांना होणार? बाजारात नेमकं काय बिघडलं?
eggs price Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 1:33 PM
Share

कांदा, साखर, दाळीच्या किंमती कडाडल्या आहेत. वस्तूच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांची झोप उडाली आहे. आता लवकरच अंड्याच्या किंमतीही वाढणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एका महिन्यानंतर अंड्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षभरात अंड्याची किंमत 35-40 टक्के वाढ झाली आहे.

‘द इकोनॉमिक टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, ‘राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या आकडेवारीनुसार, सध्या बाजारात एक अंडीमागे ७ रुपये आकारले जात आहेत. तर किरकोळ बाजारात 8.50 ते 9 रुपये आकारले जात आहेत. कुक्कुटपालन उद्योग, बाजार तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हिवाळ्यात एका अंड्याची किंमत 20-25 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पण हा दर केवळ बँडेड, प्रिमियम अंड्यासाठी असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मक्याचा वापर आता इथेनॉल निर्मितीसाठी 

अंड्याची दरवाढ ही विशिष्ट प्रकारच्या अंड्यांमध्येच पाहायला मिळू शकते. सामान्य दर्जाची अंडी महागण्याची शक्यता कमी आहे. परंतु व्यावसायिकांचा अंडी उत्पादनाचा खर्च वाढला आहे. खाद्यासाठी वापरण्यात येणारा मक्याची किंमतही वाढली आहे. 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या धोरणामुळेही बाजारात मक्याची किंमत वाढली आहे. भारतात उत्पादन होणाऱ्या मक्यापैकी सुमारे 37 टक्के मका हा इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जातो. मक्याचा भाव हा तीन वर्षांत प्रती टन 14000 रुपयांवरून प्रति टन 26600 रुपयांवर पोहोचला आहे.

…तर अंडीचे दर देखील महागणार 

रिपोर्टनुसार, संसदेच्या डाटानुसार, भारताच्या मक्क्याचं उत्पादन जवळपास 43.4 मिलियन टन इतकं आहे. त्यातील 17 मिलियन टन मक्याचा वापर हा इथेनॉल निर्मितीसाठी होत आहे. कुक्कुटपालन करताना लागणारं खाद्यापैकी 60 ते 70 टक्के भाग हा मक्याचा असतो. त्यात मक्याचा भाव वाढल्याने अंड्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर कोंबड्यांना खाद्यासाठी सोयाबीनचा देखील वापर केला जातो. सोयाबीनच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. तत्पूर्वी, भारतात साधारणपणे हिवाळ्यात अंड्याचा दर वाढतात. कोंबड़्यांना लागणारा खाद्य महागलं, तर अंड्याची किंमत सहाजिकच वाढणार आहे. चांगल्या गुणवत्तेची एक अंडी 20-25 रुपयांना विक्री होण्याची शक्यता आहे. प्रत्येक राज्यात अंडीचा दर वेगवेळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ