पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही : एकनाथ खडसे

पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही : एकनाथ खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse attack on BJP) यांनी गोपीनाथ गडावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर घणाघात केला.

सचिन पाटील

|

Dec 12, 2019 | 3:46 PM

बीड : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse attack on BJP) यांनी गोपीनाथ गडावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर घणाघात केला. “देवेंद्र फडणवीसांना पक्षाचा अध्यक्ष (प्रदेशाध्यक्ष) करायचं हे गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं, मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी संमती दिली, पण ज्यांनी मोठं केलं त्यांनाच अशी वागणूक दिली”, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला.

शांत राहा आपल्यामागे लाईन लागेल, महादेव जानकरांनी मान्य केलं कितीही त्रास दिला तरी ते सोबत राहतील, कारण मुंडे कुटुंबावर त्यांचं प्रेम आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.  (Eknath Khadse attack on BJP)

शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून भाजपला हिणवले जात होते, मात्र त्या पक्षाला मोठे करण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडे साहेबांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही, त्यांचं वाक्य नेहमी आठवतं, हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुम्हे साथ लेकर डुबेंगे, जो संघर्ष त्यांच्या वाट्याला आला, तोच प्रसंग माझ्याही आयुष्यात, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी ओक्साबोक्शी रडावंसं वाटतं, आज आमच्या पाठीशी कोण आहे? अजूनही ते कुठूनही हाक मारतील असं वाटतं, जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ, असं  एकनाथ खडसे म्हणाले.

मला सांगतात पक्षाच्या विरोधात बोलू नका, पण मी पक्षाच्या विरोधात कधी बोललोच नाही, मला पक्ष आणि नेते प्रिय, पण एकीकडे तोंडावर प्रेम करायचं आणि मागून पाडायचं हे आम्हाला दिसतं, हे घडलं नाही, घडवलं, असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला.

अजून पक्ष सोडायचा ठरलेलं नाही, मी पंकजाबद्दल बोलतोय, माझा भरोसा नाही, पक्षातून काढत नाहीत, आपोआप सोडून जातील अशी परिस्थिती करतात, आणि सांगायचं गोपीनाथ मुंडे असते, तर एकनाथ खडसेच मुख्यमंत्री झाला असता, माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, पण इथे बोलायला वेळ नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना पक्षाचा अध्यक्ष करायचं हे गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं, मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी संमती दिली, पण ज्यांनी मोठं केलं त्यांनाच अशी वागणूक दिली, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला.

मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. 

पाच वर्षे सरकार होतं , ते गेलं तरी मुंडे यांच्या स्मारकाला निधी नाही दिला. मात्र नव्याने फडणवीस  मुख्यमंत्री झाल्यानंतर 24 तारखेला निधी मंजूर केला. त्यानंतर मी त्या निधीबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो, असं खडसे म्हणाले.

जास्त बोललो तर शिस्तभंग होईल. आधीच माझं तिकीट कापलं. नाथाभाऊच आरोप काय आहे,हे मी विचारलं. मी चोरी केली की कोणत्या बाई बरोबर? आता किती अपमान सहन करायचा मी?, असे प्रश्न खडसेंनी उपस्थित केले.

पाच वर्षांपूर्वी मी मुंडेंच्या स्मारकासाठी औरंगाबादेत जिथे जागा उपलब्ध करुन दिली होती, मात्र फडणवीसांनी 5 वर्षात स्मारकासाठी काही केलं नाही. 23 तारखेला शपथ घेऊन  24 नोव्हेंबर 2019 त्याला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांकडून वर्क ऑर्डर काढण्यात आली, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

जनता तुम्ही नाही म्हणता, मात्र पक्ष्याच्या लोकांना कळत नाही, माझ्याजवळ बोलायला भरपूर आहे मात्र मला बोलायला वेळ नाही. एकेक आठवण काढली तर माजी घालमेल होते. माझ्या बाबतीत त्रास देण्याला यश आलं,मात्र पंकजाच्या बाबतीत अशी वेळ येऊ देऊ नका, असं आवाहन खडसेंनी केलं.

माझ्या आयुष्यात, गोपीनाथ मुंडेंच्या आयुष्यात जसा प्रसंग आला, तसा पंकजा तुझ्या आयुष्यात येऊ नये, यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना : एकनाथ खडसे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें