AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे सरकारचं ठरलं! धनगर आरक्षणाबाबतची मोठी बातमी, सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीतली आतली बातमी

धनगर आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. धनगर समजाला एसटीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलकांकडून उपोषण सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

शिंदे सरकारचं ठरलं! धनगर आरक्षणाबाबतची मोठी बातमी, सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीतली आतली बातमी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 15, 2024 | 6:33 PM
Share

धनगर समाजाला सध्या एनटी संवर्गातून आरक्षण मिळत आहे. पण देशभरात धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी पंढरपुरात काही आंदोलक उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित होते. या बैठकीत धनगर आरक्षणासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आगामी काळात धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारने त्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल ठेवलं आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी ‘सह्याद्री’वरील बैठक संपल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बैठकीत काय ठरलं? याबाबतची माहिती दिली.

“पंढरपुरात उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांच्या भेटीसाठी मी आणि मंत्री चंद्रकांत पाटील गेलो होतो. आज सुट्टीचा दिवस असतानाही सर्व सिनियर अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली”, असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. यानंतर बैठकीत नेमकं काय ठरलं? याबाबतची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच आपण याबाबत धनगर समाजाच्या शिष्ठमंडळातील पदाधिकाऱ्यांसोबत बोलूनही माहिती घेऊ शकता, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

धनगर आरक्षणासाठी सरकारचं काय ठरलं?

“सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मागणी होती की, धनगर आणि धनखड हे एकच आहेत, अशा पद्धतीचा स्वतंत्र जीआर सरकारने काढावा. तो जीआर कशापद्धतीचा असावा, यासाठी तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची, तसेच त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आले होते, त्यापैकी पाच प्रतिनिधी यांची समिती स्थापन करुन त्यांनी हा जीआरचा मसुदा कसा असावा, जीआर काढला तर तो कोर्टात टीकला पाहिजे, या बाबतीत ती समिती लगेचच चार दिवशात बसेल आणि जीआरचा ड्राफ्ट तयार करतील. अॅडव्होकेट जनरल साहेबांचं त्यावर मत घेतलं जाईल आणि पुढची कार्यवाही सकारात्मक करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला”, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली.

“जे उपोषणकर्ते पंढरपुरात बसले आहेत, त्यांना राज्य सरकारने विनंती केली आहे की, त्यांनी उपोषण स्थगित करावं. त्यासाठी आम्ही विभागीय आयुक्तांना पाठवलं आहे. आम्ही उपोषणाला बसले आहेत त्यांच्याशी तातडीने चर्चा करु आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करु. सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे. तसेच धनगर समाजाच्या बहुतांश मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. सरकारने सकारात्मक आश्वासन दिलं आहे”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

Follow Us
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट