तिकडे ओमराजेंसाठी ऑपरेशन धाराशिव, इकडे शिंदे म्हणाले मी दिल्लीत…अधिवेशनाआधी तोफ कडाडली!

आमच्या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा बळीराजाचा आहे. विरोधकांनी समोर बसून चर्चा करावी. त्यांनी किती मदत केली हे सांगावे. आम्ही देणारे आहोत घेणारे आहोत. शेतकरी अल निनोच्या संकटात आहेत. विरोधक, सत्ताधाऱ्यांनी एकत्र काम केले पाहिजे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

तिकडे ओमराजेंसाठी ऑपरेशन धाराशिव, इकडे शिंदे म्हणाले मी दिल्लीत...अधिवेशनाआधी तोफ कडाडली!
omraje nimbalkar and eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 21, 2026 | 7:26 PM

Eknath Shinde : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला 22 जूनपासून सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण यावेळी पाऊस कमी आहे. शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटातील बंडखोरीचा विषय आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावरही विरोधखांनी बहिष्कार घातला. दरम्यान, सत्ताधारी महायुतीने पत्रकार परिषद घेत अधिवेशनाचा अजेंडा काय असेल, याबाबत माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.  अधिवेशनाच्या काळात राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

पाऊस कमी आहे. त्यासाठी आमचे नियोजन आहे

विरोधकांचा चहापाणाच्या कार्यक्रमावर बहिष्कार चालूच आहे. तिकडे अमेरिका-इराण यांच्यातही युद्धबंदाची करार झाला. पण यांचा चहापाणावरील बहिष्कार काही संपत नाहीये. अधिवेशन हे राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आहे. परंतु विरोधी पक्षाने बहिष्काचे हत्यार कायम ठेवले आहे. मुख्यमंत्री मोहोदयांनी सांगितल्यानुसार सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याची आमची तयारी आहे. पाऊस कमी आहे. त्यासाठी आमचे नियोजन आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, तर ते त्यांनी मांडावेत, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

आम्ही अगदी गोगलगाईने केलेलं नुकसानही आम्ही भरुन दिलं

मुख्यमंत्री मोहोदयांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत आकडेवारीसहीत सगळं सांगितलं आहे. महायुती सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्यांना मदत झाली आहे. अशी मदत अगोदर कधीच झालेली नाही. शेतकऱ्यांना मदत करताना महायुतीने कधीही हात आखडता घेतला नाही. आम्ही अगदी गोगलगाईने केलेलं नुकसानही आम्ही भरुन दिलं. तरीही विरोधक बिनबुडाचे आरोप करत असतात. सध्या निवडणुका नाहीत. तरीही आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. आम्ही शब्द पाळणारे आहे, असेही शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे

आमच्या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा बळीराजाचा आहे. विरोधकांनी समोर बसून चर्चा करावी. त्यांनी किती मदत केली हे सांगावे. आम्ही देणारे आहोत घेणारे आहोत. शेतकरी अल निनोच्या संकटात आहेत. विरोधक, सत्ताधाऱ्यांनी एकत्र काम केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येता कामा नये. लवकरात लवकर पाऊस पडावा, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी आपण प्रार्थना करुयात, असे म्हणत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

बिनबुडाचे आरोप करू नयेत

अधिवेशन जेव्हा सुरू असतं तेव्हा राजकारण बाजुला ठेवून समाजकारण करावे. शेतकरी, लाडक्या बहिणी यांना न्याय कसा देता येईल, ते बघावे. विरोधक चुकत असेल तर जरूर प्रश्न उपस्थित करावे. परंतु बिनबुडाचे आरोप करू नयेत, असे शिंदे विरोधकांना उद्देशून म्हणाले. यावेळी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. खासदार ओमराजे निंबाळाकर यांना पक्षात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आमदार तानाजी सावंत यांच्यावर विशेष जाबाबदारी सोपवलेली आहे. ते सध्या धाराशिवमध्ये आहेत. एकीकडे ओमराजे निंबाळकर यांना पक्षात घेण्यासाठी शिंदेंचे प्रयत्न सुरू असताना त्यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य केले आहे. मी दिल्लीला गेलो तरी पोटात दुखतं. मी गावाला गेलो तरी पोटात दुखतं, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

Follow Us