AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंना सलग दुसरा झटका, सचिन आहिर यांनी उपसभापतीपदाचा फॉर्म भरताच एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया..

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026 Eknath Shinde Sachin Ahir : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा दोन आठवड्यात दुसऱ्यांदा मोठा गेम केला. ज्याने राज्यात एकच खळबळ उडाली. थेट उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याला शिवसेना शिंदे गटाकडून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली.

उद्धव ठाकरेंना सलग दुसरा  झटका, सचिन आहिर यांनी उपसभापतीपदाचा फॉर्म भरताच एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया..
Vidhan Parishad Deputy Chairman Election Eknath Shinde Sachin Ahir
| Updated on: Jun 30, 2026 | 12:40 PM
Share

आज शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीसाठी अर्ज दाखल करण्यात आला. दोन आठवड्यात दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी थेट शिवसेना एकनाथ शिंदे यांचा हात पकडला. शिवसेना शिंदे गटाने थेट सचिन आहिर यांना विधान परिषदेचा उमेदवार म्हणून घोषित केले. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सचिन आहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. हा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना म्हणावा लागेल. कोणालाही विश्वास बसणार नाही, अशा घडामोडी घडताना दिसल्या. थेट सचिन आहिर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे उपसभापती पद शिवसेना शिंदे गटाकडून आहे. त्यामध्येच थेट सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला. ही निवडणुक बिनविरोध होणार नाही. विधान परिषद उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा होती. पण सचिन आहिर यांना उमेदवारी देण्यात आली. आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे स्वत: सचिन आहिर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्यातील महत्वाचे नेते उपस्थित होते.

यादरम्यान सचिन आहिर यांच्या उमेदवारीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली. त्यांनी थेट यावर भाष्य केले. एकनाथ शिंदे आणि सचिन आहिर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकत्र बाहेर पडताना दिसले. यावेळी एकनाथ शिंदे यांचा चेहरा सर्वकाही सांगून जाताना दिसला. माध्यमांनी त्यांना सचिन आहिर यांच्या उमेदवारीवर प्रश्न विचारला.

यावर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया देत म्हटले की, मी सर्वकाही पत्रकार परिषदेमध्ये बोलेल. एकनाथ शिंदे यांच्याकडून दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. तिथेच ते या उमेदवारीबद्दल बोलताना दिसलीत. एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीदरम्यान थेट मोठा गेम फिरवला आहे. हा थेट मोठा धक्का आहे. यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत.

Follow Us
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा