एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातले मुख्यमंत्री, नीलम गोऱ्हेंचं मोठं वक्तव्य

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मोठं विधान केलं आहे, एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या, गोऱ्हे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.

एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातले मुख्यमंत्री, नीलम गोऱ्हेंचं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2025 | 8:17 PM

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, नीलम गोऱ्हे यांच्या पुस्तकाचं नुकतच प्रकाश झालं, या कार्यक्रमात त्या बोलत होत्या, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती.

नेमकं काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे? 

नीलम गोऱ्हे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी दरवर्षी एक पुस्तक लिहिते,  महिला धोरण, स्त्री सशक्तीकरण यावर आधारीत हे विषय असतात. दारू विरोधात महिलांनी आंदोलनं केली, त्या प्रकरणात महिलांवर दाखल असलेले 32  हजार गुन्हे आमच्या सरकारच्या काळात मागे घेण्यात आले.  महिलांना येणाऱ्या अडचणी यावर मी मुंबई सकाळमध्ये एक सदर लिहित होते, त्या सर्व लेखांवर आधारीत हे पुस्तक आहे.  टक्केवारी फक्त कामात नसते तर भाषणातही असते. त्यामुळे तुम्ही सविस्त बोला, असंही यावेळी नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. दरम्यान या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती, त्यांनी यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे यांचं कौतुक केलं आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

आपल्या सगळ्याची लाडकी बहीण नीलम गोऱ्हे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. नीलम गोऱ्हे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे. ज्ञानाचं खोरे म्हणजे निलम ताई गोऱ्हे.  राजकारणात काही जणं दिशाहीन झालेले असताना,  नीलमताईंनी बाळासाहेबांच्या विचारांची दिशा पकडली. नीलमताईंना मी सांगितलं एक पुस्तक लिहा.  आमचा उठाव हे खूप  कठीण काम होतं. सगळ्यांना माहितीये त्यावेळेची परिस्थितीत काय होती.  एकही माणूस असा नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता.  आपण घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या हितासाठी घेतली आहे, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे, ते या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.