AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे, अमित शाहांमध्ये 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

एकनाथ शिंदे, अमित शाहांमध्ये 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
| Updated on: Aug 06, 2025 | 4:28 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे, तसेच ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील भेटणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.  या भेटीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये या भेटीदरम्यान 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली आहे. या भेटीदरम्यान वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  लवकरच शाहांसोबत महायुतीमधील घटक पक्षांची देखील बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  महायुतीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी भावना एकनाथ शिंदे यांची आहे. यासोबतच अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले? 

दरम्यान या भेटीवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. सर्व खासदारांसोबत मी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती, खासादारांचे देखील काही विषय होते, तेही मी या भेटीदरम्यान मांडले.  मागच्या आठवड्यात देखील मी आलो होतो, त्यावेळी मी त्यांना भेटलो नव्हतो, म्हणून आज सदिच्छा भेटही झाली आणि खासदारांसदर्भातील काही विषय होते, ते ही मांडले.  मी तर जाहीरपणे भेटतो, खासदारांसोबत भेटतो, जे काही विकासात्मक प्रकल्प आहेत, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांच्या वतीनं सुरू आहेत, त्यावर देखील यावेळी चर्चा झाली.  दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे, मी लपून छपून काही काम करत नाही. मी जे करतो ते सगळ्यांच्या समोर करतो, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता थोड्याचवेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण