एकनाथ शिंदेंनी घेतली पतंप्रधान नरेंद्र मोदींची भेट, तासभर चर्चा, नेमकं काय घडतंय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली आहे.

एकनाथ शिंदेंनी घेतली पतंप्रधान नरेंद्र मोदींची भेट, तासभर चर्चा, नेमकं काय घडतंय?
Eknath Shinde
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 7:16 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली आहे. आगामी विधान परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उमपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच या बैठकीमध्ये संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात देखील चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे.

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात निवडणूक होणार आहे. या दोन्ही मतदासंघात आधीपासूनच भाजपने दावा केला होता. या जोन्ही जागा भाजपच्याच असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील मोठा दावा केला होता. या दोन्ही मतदारसंघात आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहोत, मात्र वेळ पडली तर भाजप म्हणून देखील लढण्याची आमची तयारी आहे, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं होतं, त्यानंतर अपेक्षेप्रमाणे या दोन्ही जागा महायुतीमध्ये भाजपच्याच वाट्याला आल्या.

Loading...

परंतु पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे मंगेश चिवटे हे देखील इच्छूक आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनीच त्यांना पुणे विधान परिषदेच्या या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीवर उदय सामंत यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर आमचा दावा आहे, येथून मंगेश चिवटे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असं सामंत यांनी म्हटलं होतं.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली आहे. नेमकी कोणत्या विषयावर ही चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us