एकनाथ शिंदे यांचं मोठं पाऊल, महायुतीतील नाराजीनाट्यानंतर एकटेच थेट…मोठी अपडेट समोर!

महायुतीतील नाराजी संपलेली आहे, असे बोलले जात होते. असे असतानाच आता मोठी माहिती समोर आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे नेमकं काय घडतंय, असं विचारलं जात आहे.

एकनाथ शिंदे यांचं मोठं पाऊल, महायुतीतील नाराजीनाट्यानंतर एकटेच थेट...मोठी अपडेट समोर!
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 19, 2025 | 4:28 PM

Eknath Shinde Visits Delhi : महायुतीत सध्या मोठे नाराजीनाट्य रंगले आहे. शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या अनेक नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश दिला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी महायुतीती बेदिली वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने यावर कठोर आक्षेप व्यक्त केला आहे. त्याची एक झलक म्हणून 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरही शिवसेनाच्या सर्वच मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता. दरम्यान, आमच्यातील मतभेद मिटले आहेत, असा दावा केला जात असला तरी हा वाद अजूनही थांबलेला नसल्याचे दिसत आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदेंच्या या दिल्लीवारीमुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे थेट दिल्लीला रवाना

मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनात शिंदे थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदे थेट दिल्लीच्या दिशेने निघाल्यामुळे यामागचं कारण काय असेल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आज मुंबईत पोलिसांबाबत एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमालाही शिंदे यांची उपस्थित नव्हती. प्राथमिक माहितीनुसा शिंदे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाहा यांची भेट घेणार आहेत. राज्यातील नेतृत्त्वाकडून युती धर्माचे पालन केले जात नाही, अशी तक्रार घेऊन शिंदे अमित शाहांकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे. महायुतीतील युती धर्म या विषयावर शिंदे-शाहा यांच्यात चर्चा होईल, असेही सूत्रांनी सांगितेले आहे.

18 नोव्हेंबर रोजी नेमकं काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे भाजपाकडून वेगवेगळ्या पक्षांच्या स्थानिक नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पक्षात प्रवेश दिला जात आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षातील काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी हाती भाजपाचा झेंडा घेतला आहे. भाजपाच्या या धोरणावर शिंदे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर सर्व मंत्री आणि शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत शिवेसनेच्या मंत्र्यांनी आपली खदखद बोलून दाखवली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याती सुरुवात तुम्हीच केली, असे सांगितले. शेवटी महायुतीतील मित्रपक्षांनी एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना प्रवेश द्यायचा नाही, असे ठरवण्यात आले. तशी माहिती खुद्द एकनाथ शिंदे यांनीच दिली होती. परंतु आता शिंदे हे थेट दिल्लीवरीवर असल्यामुळे अजूनही महायुतीतील वाद मिटलेला नाही, असा दावा केला जात आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.