AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात खळबळ उडावणारं भाकित, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं…महायुतीतील नाराजीनाट्यानंतर बड्या नेत्याने थेट सांगितलं!

महायुतीमध्ये सध्या मोठे नाराजीनाट्य रंगले आहे. भाजपातील इन्कमिंगवरून शिवसेनेमध्ये नाराजी पसरली आहे. असे असतानाच आता कधीकाळी भाजपासोबत असलेल्या माजी मंत्र्याने शिंदे यांच्याबाबत मोठं भाकित व्यक्त केलं आहे.

राजकारणात खळबळ उडावणारं भाकित, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं...महायुतीतील नाराजीनाट्यानंतर बड्या नेत्याने थेट सांगितलं!
eknath shinde and devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2025 | 3:49 PM
Share

Bacchu Kadu Criticizes BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात चांगलं राजकारण रंगलं आहे.महायुतीत तर मोठा वाद उफळला आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातून भापजात मोठी इन्कमिंग होत आहे. याच इन्कमिंगमुळे आता महायुतीत मोठी खदखद पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे माजी आमदार शहाजीबापू पटाली यांनी अबला महिलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपाची वागणूक आहे, असे म्हणत खदखद व्यक्त केली आहे. त्यानंतर शिंदे यांच्या सर्वच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर महायुतीतील नाराजीनाट्य जगजाहीर झाले. असे असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची नाराजी लक्षात घेऊनच, कधीकळी महायुतीचा भाग असलेल्या माजी मंत्र्याने शिंदे यांच्या पक्षाबाबत मोठं भाकित वर्तवलं आहे.

भाजपा चांगला दुष्मन असू शकतो पण..

माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. सोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे भवितव्य खडतर असणार आहे, असे भाकित त्यांनी व्यक्त केले आहे. महायुती ही तीन पक्षांची युती आहे. पण भाजपा आपले वर्चस्व कुठेच सोडणार नाही. भाजपा चांगला दुष्मन असू शकतो. पर भाजपा पक्ष कधीच चांगला मित्र होऊ शकत नाही. भाजपा मित्रांसोबत बेईमानी करतो. भाजपाकडून दगाबाजी केली जाते, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली.

एकनाथ शिंदे यांचेही उद्धव ठाकरेंप्रमाणेच…

तसेच मित्रांना गरजेपुरते सोबत ठेवणे हाच भाजपाचा अजेंडा आहे. गरज संपली की भाजपा मित्रपक्षांना शत्रूसारखी वागणूक देते, असेही बच्चू कडू म्हणाले. एकनाथ शिंदे यांचे तसेच त्यांच्या शिवसेना पक्षाचे भवितव्य सांगताना बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उदाहरण दिले. जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाले. तेच एकनाथ शिंदे यांच्यासोबतही होईल. जो पक्ष झेप घेतो. त्या पक्षाचे भाजपाकडून पंख छाटले जातात, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला.

महायुतीत ठरला नवा नियम

दरम्यान, महायुतीमध्ये नाराजीनाट्य रंगल्यानंतर ही धुसफूस मिटवण्यासाठी महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.