AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिनो मोरियानं तोंड उघडलं तर..; सभागृहात एकनाथ शिंदेंचा मोठा इशारा

विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी अभिनेता डिनो मोरियाचा उल्लेख केला. मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील अनियमितता आणि निधीच्या गैरवापर प्रकरणी डिनो मोरियाचं नाव समोर आलंय.

डिनो मोरियानं तोंड उघडलं तर..; सभागृहात एकनाथ शिंदेंचा मोठा इशारा
डिनो मोरिया, एकनाथ शिंदेImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 17, 2025 | 1:32 PM
Share

मिठी नदीतला गाळ काढण्याचा कंत्राट देताना मराठी माणूस दिसला नाही का, असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत विरोधकांवर भडकले. आता त्या डिनो मोरियाने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरया होईल, असा मोठा इशारा त्यांनी दिला. विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांनी उत्तर दिलं. “काँक्रीटचे रस्ते केल्यानंतर त्यात 25 वर्षे दुरुस्ती करावी लागत नाही. मग दरवर्षी दुरुस्ती करून, काळ्याचं पांढरं करून, त्यामध्ये दुरुस्तीची कामं काढून पैसे लुबाडण्याचं काम कोण करत होतं? आम्ही तर डीप क्लीन ड्राइव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या,” अशी खरमरीत टीका त्यांनी विरोधकांवर केली.

मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील अनियमितता आणि निधीच्या गैरवापराचं प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. याप्रकरणात बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाचं नाव समोर आलं आहे. त्याची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावरून विरोधकांना निशाणा साधत शिंदे पुढे म्हणाले, “बोलायला आम्हाला पण येतं. मिठी नदीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? यांना डिनो मोरिया दिसला, मराठी माणूस नाही दिसला का? आता त्या मोरियाने तोडं उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरया होईल. आरोप करताना असे करा.. जो खुद शिशे के घर मे रहते है, वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते. जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता, तेव्हा तुम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण, ते पण सांगा. सगळी यादी काढा, मग मराठी माणसाबद्दल बोला.”

मिठी नदीतील गाळ काढण्यात भ्रष्टाचार?

मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी 1100 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं होतं. एकूण 18 कंत्राटदारांना हे कंत्राट देण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. त्यापैकी अनेकांची चौकशीसुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी पालिकेचे 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात आता ईडीनेही उडी घेतली आहे. कथित गैरव्यवहारसंबंधी आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू असून त्यासाठी हे छापे टाकण्यात आल्याचं कळतंय. याप्रकरणी डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो या दोघांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!