मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कर्जमाफीची घोषणा

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.

मोठी बातमी :  शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कर्जमाफीची घोषणा
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 4:16 PM

मुंबई :  परतीच्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालंय. उभी पिकं पाणी पाण्याखाली गेली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अशात सरकारी मदत कधी केली जाणार याबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात होते.त्याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे.  भूविकास बॅकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी (Farmers Loan Waiver) करण्यात आली आहे. 964 कोटी रुपयांची कर्जमाफी (Shetkari Karjmafi) करण्यात आली आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.

7 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती शिंदेंनी केली आहे.

परतीच्या पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तातडीने हे सगळे पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

शिंदे सरकार स्थापनेपासूनच शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत आहे. आम्ही अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. आताही आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करत आहोत, असं म्हणत शिंदे यांनी कर्जमाफीबाबत माहिती दिली.

शेतकऱ्यांनी खचू नये. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. मदतीसाठी सरकार तयार आहे, असंही शिंदे म्हणालेत.

तसंच राजकीय, सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यात येत असल्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  30 जून 2022 पर्यंतचे सर्व गुन्हे मागे घतले जाणार आहेत.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.