AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आरोग्यदूत मंगेश चिवटेंचा पत्ता कट? पुण्याची जागा भाजपाच्या वाट्याला!

सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगूल वाजलंय. आता जागावाटपावर खल सुरू आहे. महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला द्यायची यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आता पुण्याच्या जागेवरून आग्रही असणाऱ्या मंगेश चिवटे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! आरोग्यदूत मंगेश चिवटेंचा पत्ता कट? पुण्याची जागा भाजपाच्या वाट्याला!
mangesh chivate and eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 4:31 PM
Share

Mangesh Chivte : सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगूल वाजलंय. आता जागावाटपावर खल सुरू आहे. महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला द्यायची यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आता पुण्याच्या जागेवरून आग्रही असणाऱ्या मंगेश चिवटे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ते तयारी करत होते. विशेष म्हणजे ही उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या गाठीभेटीही चालू होत्या. परंतु आता ऐनवेळी त्यांना मोठा धक्का बसला आहे. ते ज्या पुण्याच्या जागेवरून लढण्यासाठी उत्सूक होते ती जागाच भाजपाच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे मंगेश चिवटे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास आणि विश्वासू मानले जातात.

महायुतीत नेमकं काय ठरलं?

मिळालेल्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून उमेदवारांच्या नावांची यादी वरिष्ठ नेतृत्वाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे तीन जागांवरील 15 संभाव्य नावांची यादी सुपूर्द करण्यात आली आहे. प्रत्येक जागेसाठी 5 नावांचा पर्याय ठेवण्यात आलाय.  पुणे पदवीधर, पुणे शिक्षक व नागपूर पदवीधर भाजप ही जागा भाजपा लढवण्याची शक्यता आहे. अमरावतीचा जागा शिवसेना पक्षाला  तर संभाजीनगरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

कोणती जागा कोणाला मिळाली?

दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर भाजपच पुणे शिक्षक लढणार असल्याचे महायुतीचे एकमत झाल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना व राष्ट्रवादीमधील इच्छुकांची समजूत काढण्याचा प्रयत्न होणार आहे. पुण्याच्या जागेवरील संभाव्य नावेही चव्हाणांकडून नवीन यांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. त्यामुळे मंगेश चिवटे यांचा पत्ता कट झाला का? असे विचारले जातेय.

 तरीही मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज भरणार?

दरम्यान, पुण्याची शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला जाणार असल्याचे बोलले जात असले तरीही मंगेश चिवटे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले जातेय. एकनाथ शिंदे यांना मंगेश चिवटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!