AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पालिकेवर आता शिंदे गटाचा महापौर? मोठा बदल होण्याची शक्यता, महायुतीत काय घडतंय?

मुंबई पालिकेवर लवकरच शिंदे गटाचा महापौर? मोठा बदल होण्याची शक्यता, महायुतीत काय घडतंय?

मुंबई पालिकेवर आता शिंदे गटाचा महापौर? मोठा बदल होण्याची शक्यता, महायुतीत काय घडतंय?
devendra fadnavis and bmc mayorImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2026 | 7:13 PM
Share

BMC Mayor Post : मुंबई महापालिकेवर सध्या महायुतीची सत्ता आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यात सत्ता विभागून देण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने  जोरदार मुसंडी मारली होती. पण महायुतीचा धर्म म्हणून शिंदे गटालाही सत्तेत सामील करून घेण्यात आले. सध्या मुंबई पालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या नेत्या रितू तावडे या आहेत. दरम्यान, आता नवी माहिती समोर येत आहे. भविष्यात शिंदे गटाचा नेता मुंबईच्या महापौरपदी विराजमान होण्याची शक्यता आहे.

महायुतीत नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेत लवकरच शिंदेंच्या शिवसेनेला महापौरपद मिळण्याची शक्यता आहे. अडीच वर्षानंतर शिवसेनेला पालिकेचे महापौरपद दिले जाऊ शकते. महायुती समन्वय समितीत शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून बीएमसीच्या महापौरपदाचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे.

सव्वा-सव्वा वर्षाचा नवा फॉर्म्यूला काय आहे?

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या अडीच वर्षाच्या टप्प्यात पालिकेचे महापौरपद हे भाजपाकडेच असेल. त्यानंतर दुसऱ्या अडीच वर्षाच्या टप्प्या महापौर पदासाठी भाजप-सेनेत सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरवण्यात आलेला आहे. म्हणजेच दुसऱ्या अडीच वर्षाच्या टप्प्यात पहिल्या सव्वा वर्षात शिंदे गटाकडे महापौरपद असेल. त्यानंतर सव्वा वर्षात पुन्हा एकदा भाजपाकडे महापौरपद दिले जाणार आहे. महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेला तस शब्द देण्यात आला होता, अशी माहिती आता समोर येत आहे.

सध्या महायुतीपुढे कोणतं संकट, शिंदे गट काय करणार?

दरम्यान, सध्यातरी भाजपाच्या रितू तावडे या मुंबईच्या महापौर आहेत. महापौरपद मिळाल्यापासून त्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. पावसामुळे झाडे पडल्यामुळे, मॅनहोलध्ये पडून मृत्यू झाल्याने त्यांच्यावर टीका झाली. पावसाळ्याआधीची कामे पूर्ण ताकदीने करण्यात आली नाहीत. तसेच योग्य नियोजन न केल्याने पावसाळ्यात मुंबई तुंबली असा आरोप करण्यात आला. आता भविष्यात शिंदे गटाला महापौरपद दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता सत्यात उतरली तर शिंदे गट नेमकं काय करणार? मुंबईच्या विकासासाठी कोणती पावलं उचलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....