Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गरम पाणी, तोंडाला मास्क अन्…’, एकनाथ शिंदेंनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं

एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली, ते नांदेडमध्ये बोलत होते.

'गरम पाणी, तोंडाला मास्क अन्...', एकनाथ शिंदेंनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं
uddhav thackeray and eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 06, 2025 | 8:03 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नांदेडमध्ये बोतल होते. मुख्यमंत्री फक्त मंत्रालयात बसायचं काम नाही, फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम कारयचं. गरम पाणी प्या, तोंडाला मास्क लावा, एवढ्या पुरत काम नाही. लोकांना भेटावं लागतं, शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतं, बहिणींना भेटावं लागतं, भावाला भेटावं लागतं. मी जिथे जातो तिथेच मंत्रालय सुरू होतं, ऑन द स्पॉट काम करतो. मी अडीच वर्षात एवढ्या सह्या केल्या सर्व रेकॉर्ड मोडले, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 460 कोटी रुपये दिले, किती लोकांचे जीव वाचले असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देखील दिले आहेत. सगळ्यांनी मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस यश मिळेल. नांदेडमध्ये शिवसेनेचे तीन आणि महायुतीचे सगळे मिळून नऊ आमदार निवडून आणले आहेत. आता मुंबईत ठरलेले मतदारसंघ वगळता कोणीही मतदारसंघ सोडणार नाही. आमदारकीच्या निवडणुका झाल्या आहेत, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे आता आपलं फाउंडेशन आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहिलं पाहिजे. विश्वास, इमानदारी, प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही, ही आपल्या शिवसैनिकांची पुंजी आहे. कार्यकर्ते जोडा, कार्यकर्ता जपा, पदाधिकारी नेमताना जवळचा परका असा भेदभाव करू नका, जे आपण पेरलं ते उगवलं, विधानसभेत 267 जागा येणे म्हणजे इतिहास आहे. सुवर्ण अक्षराने नोंद करावा असा इतिहास आहे. सगळ्या महाराष्ट्रातून शिवसेनेत प्रवेश होत आहेत. प्रवेशांना वेग आला आहे, आपल्या पक्षात कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही  हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.