शिंदे म्हणाले तुम्हाला पुन्हा भेटायचंय; उद्धव ठाकरेंनी हातच जोडले…, सभागृहात नेमकं काय घडलं?

विधान परिषदेमधील 9 सदस्य आज निवृत्त झाले, यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश आहे. विधानपरिषदेतील 9 सदस्यांच्या निरोप समारंभावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले तुम्हाला पुन्हा भेटायचंय; उद्धव ठाकरेंनी हातच जोडले..., सभागृहात नेमकं काय घडलं?
eknath shinde, uddhav thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 24, 2026 | 8:18 PM

विधान परिषदेमधील 9 सदस्य आज निवृत्त झाले, यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश आहे. विधानपरिषदेतील 9 सदस्यांच्या निरोप समारंभावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक कविता सादर केली. ‘सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नातं तूटत नाही. निरोपाचा सन नाही तुमच्या भेटीसाठी आतुर हे मन आहे, तुमच्या भेटीची आस पुन्हा आहे,’ असं यावेळी शिंदे यांनी म्हणताच उद्धव ठाकरे यांनी हात जोडले. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी हात जोडताच सभागृहात एकच हाशा पिकल्याचं पहायला मिळालं.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?  

आज 9 सदस्य निवृत्त होत आहेत. कधी कधी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यरोप होतात. पण आपण आज हळव्या वळणावर आलो आहोत. 9 सदस्य आहेत, ज्यात उद्धव ठाकरे साहेब आहेत. उद्धव ठाकरे साहेब आज निवृत्त होत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो,  पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, राजेश राठोड देखील आज निवृत्त होत आहेत. राजेशजी शांत व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.  ग्रामीण भागातील विकास याकडे आपला कायम भर असतो.  सभागृहात विरोधकांची गरज असते तेव्हा राजेश राठोड यांच योगदान देखील असतं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

फडणवीस यांनी काय म्हटलं? 

दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठं विधान केलं. मला आनंद वाटतो की आलेले सदस्य आणि निरोप घेणारे सदस्य यांच स्वागत होत, निरोप समारंभ होत असतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धवजी यांचा निरोप समारंभ होत आहे. राजकारणात मतभेद असतात पण वेगळं नातं असतं, ते नातं असत सहप्रवासाच नातं, अनेक वर्षाचे आम्ही उद्धवजींसोबत सहप्रवासी राहिलो आहेत. उद्धवजी यांचा स्वभाव राजकारणी नाही, त्यामध्ये थोडं राजकारण कमी आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं.

 

Follow Us