एसआयआर संदर्भात महाराष्ट्रासाठी निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय, तातडीने नवा आदेश लागू, आता थेट…

सध्या राज्यासह देशभरात एसआयआर (SIR) चा मुद्दा चांगलाच तापला आहे. इंडिया आघाडीकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

एसआयआर संदर्भात महाराष्ट्रासाठी निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय, तातडीने नवा आदेश लागू, आता थेट...
Election Commission
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 06, 2026 | 10:07 PM

सध्या राज्यासह देशभरात एसआयआर (SIR) चा मुद्दा चांगलाच तापला आहे. इंडिया आघाडीने एसआयआरच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्द्यावरून इंडिया आघाडीच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच इंडिय़ा आघाडीकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत आहे. एक नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील रामलिला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या महारॅलीमध्ये जवळपास वीस विरोधी पक्ष सहभागी झाले होते. यावेळी इंडिया आघाडीकडून निवडणूक आयोगासह केंद्रातील एनडीएच्या सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल करण्यात आला, दरम्यान त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

ज्या राज्यात सध्या एसआयआर प्रक्रिया सुरू आहेत, तिथे ड्राफ्ट मतदार सूचीमधून वगळण्यात आलेल्या मतदारांचं पुन्हा एकदा यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी आता निवडणूक आयोगाकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहेत. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आदेश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, नागालँड, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, आणि झारखंड अशा सात राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार आता ज्या मतदारांचे नाव ड्राफ्ट मतदार सूचीमधून वगळण्यात आलेले आहेत, ते लोक खरच त्या पत्त्यावर राहतात का हे पुन्हा एकदा बीएओला घरी जाऊन चेक करावं लागणार आहे.

Loading...

एवढंच नाही तर ज्या मतदारांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्या मतदारांच्या नावाची यादी संबंधित पोलिंग बूथवर लावली जावी, यामुळे संबधित मतदारांना आपलं नाव वगळण्यात आल्याची माहिती मिळेल आणि ते पुन्हा आपलं नाव मतदार यादीमध्ये जोडू शकतील असे आदेश देखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. यासाठी निवडणूक आयोगाकडून एक फॉर्म देखील जारी करण्यात आला आहे. दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष ठेवावं, कोणताही मतदार यादीमधून सुटणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सूचनाही निवडणूक आयोगाकडून अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us