एकट्या रत्नागिरीत 119 ग्रामपंचायती बिनविरोध, खर्च वाचला तब्बल…..

| Updated on: Jan 15, 2021 | 7:54 PM

रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 119 ग्रामपंतायती बिनविरोध झाल्या आहेत (Gram Panchayat Election Ratnagiri)

एकट्या रत्नागिरीत 119 ग्रामपंचायती बिनविरोध, खर्च वाचला तब्बल.....
Follow us on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंतायत निवडणुकांचा धुराळा उडालाय (Gram Panchayat Election Ratnagiri). पण रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 119 ग्रामपंतायती बिनविरोध झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे तब्बल 47 लाखांचा खर्च वाचला आहे. एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर निवडणुक आयोगाचा 40 हजारांचा खर्च वाचतो. रत्नागिरी जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंतायती बिनविरोध झाल्याने निवडणुक आयोगाचे कसे पैसे वाचलेत याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

निवडणुक म्हणजे पैशांचा खेळ असं आपण सहज म्हणतो. ग्रामपंचायत निवडणूक असो किंवा मग लोकसभेची निवडणुक, या निवडणुकीमुळे खर्च होणारा पैसा हा सर्वसामान्य जनतेच्या खिशातून कर रुपाने जात असतो. सध्या ग्रामपंतायत निवडणुकीची रंगत राज्यात पहायला मिळतेय. रत्नागिरीत सुद्धा अर्ज माघारी घेण्याची शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील चित्र सष्ट झालं आहे. यात 479 पैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या बिनविरोध झालेल्या ग्रामपंतायतींमुळे निवडणूक आयोगाचे लाखो रुपये वाचले आहेत.

एक ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार केला तर एक निवडणुकीसाठी 40 हजारांचा खर्च येतो. याबाबतचे विश्लेषण करायचे झाल्यास, कर्मचारी, त्यांचा भत्ता, मतदान पेट्या ने-आण करणे, त्यासाठीची सुरक्षा, वाहने, कर्मचारी भोजन भत्ता, मतमोजनी आणि मतदान केंद्रावरील साहित्य या सगळ्या गोष्टींचा खर्च येतो.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने एक प्रकारे या ग्रामपंचायतींनी मोठी कामगिरी केली आहे. यामुळे गावागावातले वाद सुद्धा दूर होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 119 ग्रामपंतायती बिनविरोध झाल्याने तब्बल 47 लाख 60 हजार रुपये वाचले आहेत (Gram Panchayat Election Ratnagiri).

संबंधित बातम्या :

कुठे निवडणुका?, कुठे बिनविरोध; रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट